इथे तुमचे हातवारे चालणार नाहीत… पिंजऱयात जाऊन गपगुमान उभे रहा…न्यायालयाने फटकारले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘रिपब्लिक’च्या स्टुडिओमध्ये हातवारे करत आरडाओरडा करणाऱया अर्णब गोस्वामीने न्यायालयातही आरडाओरडा सुरू केला. हातवारे करत तो पोलिसांवर आरोप करू लागला. थेट न्यायाधीशांसमोर येऊन त्याने पोलिसांनी बुट घालू दिले नाहीत, फक्त सॉक्सवरच कसे आणले असा थयथयाट केला. तेव्हा जिल्हा सत्र न्यायमूर्ती सुनयना पिंगळे यांनी तुमचे हातवारे इथे चालणार नाहीत.. गपगुमान जाऊन पिंजऱयात उभे रहा असे जबरदस्त फटकारे अर्णबला लगावले. त्यानंतर तो खाली मान घालून आरोपीच्या पिंजऱयात येऊन उभा राहिला.

कडक बंदोबस्त
अर्णबला मुंबईतून उचलून अलिबागला आणण्याआधी पोलिसांनी कडक बंदोबस्त लावला. पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक यांच्यासह एक उपविभागीय पोलीस अधिकारी, चार सहाय्यक पोलीस निरीक्षक, दहा पोलीस उपनिरीक्षक, 78 पोलीस कर्मचारी आणि माणगाव येथून एका प्लॅटूनला पाचारण करण्यात आले होते.

मारहाणीचा कांगावा न्यायालयाने फेटाळला
पोलिसांनी मला बेदम मारहाण केली. त्यामुळे मला जखम झाली असा कांगावा अर्णबने न्यायालयात सुरू केला. अॅड. आबाद फोंडा हे मुंबईतून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगवरून तर अलिबागमधून अॅड. गौरव पारकर अर्णबची बाजू मांडत होते. त्यामुळे न्यायालयाने त्याची पुन्हा वैद्यकीय तपासणी करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पोलिसांनी जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांना बोलावून तपासणी केली आणि तसा अहवाल न्यायालयात सादर केला. सायंकाळी 5 वाजता अर्णबला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी त्याने मला मारहाण झाली असे पालुपद लावले. मात्र पोलिसांनी आमच्याकडे त्याच्या घरून कोर्टात आणेपर्यंतचे व्हिडीओ रेकॉर्डिंग आहे, आम्ही मारहाण केली नाही असे सांगत तो व्हिडीओच न्यायालयात सादर केला. सर्व पुरावे पडताळून पाहिल्यानंतर अखेर सायंकाळी 6.30 वाजता मारहाण झाल्याचा अर्णबचा दावा न्यायालयाने फेटाळून लावला.

अलिबाग कोर्टात दहा तासांचा पहिला खटला
दुपारी 1 ते रात्री 11 वाजेपर्यंत असा एकूण दहा तास चाललेला अलिबाग न्यायालयातील हा पहिलाच खटला. पोलिसांनी अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडत पोलीस कोठडीची मागणी केली. न्यायालयाबाहेर रायगड जिह्याबरोबरच मुंबई, पुण्यातील वृत्तवाहिन्या आणि मीडियाच्या पत्रकारांचीही गर्दी होती. रात्री 11 वाजेपर्यंत सुनावणी लांबली. रात्री 11 नंतर न्यायमूर्ती सुनयना पिंगळे यांनी अर्णबला 18 नोव्हेंबरपर्यंत 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.

भरन्यायालयात शूटिंग, पत्नीचा मोबाईल न्यायालयाने जप्त केला
अर्णबला न्यायालयात हजर केल्यानंतर त्याच्या पत्नीने थेट न्यायालयातील कामकाजाची मोबाईलवरून व्हिडीओ शूटिंग करण्यास सुरुवात केली. हे पाहताच न्यायमूर्ती पिंगळे यांनी ‘हे न्यायालय आहे याचे भान ठेवा’ असे खडे बोल सुनावले आणि तिचा मोबाईल जप्त करण्याचे आदेश पोलिसांना दिले.

घटनाक्रम

सकाळी 5.15 – रायगड पोलिसांची टीम अर्णबच्या घरी दाखल.
सकाळी 7.15 – अर्णबने दरवाजाच उघडला नाही.
सकाळी 7.30 – पोलीस निघून गेल्याचा समज करून अर्णबने दार किलकिले गेले आणि पोलीस घरात घुसले.
सकाळी 7.55 – अर्णबला घेऊन पोलीस अलिबागच्या दिशेने रवाना.
सकाळी 11.30 – अलिबाग पोलीस ठाण्यात आणले.
दुपारी 12.00 – रायगड जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉक्टरांनी तपासणी केली.
दुपारी 1.00 – न्यायालयात हजर केले.
दुपारी 1.30 – अर्णबने पोलिसांनी मारहाण केल्याची तक्रार केल्यानंतर त्याला पुन्हा वैद्यकीय तपासणीसाठी पोलीस ठाण्यात आणण्यात आले. तेथे पुन्हा डॉक्टरांनी तपासणी केली.
सायं. 5.00 – पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले.
सायं. 7.30 – मारहाण झाल्याची तक्रार न्यायालयाने फेटाळली.
सायं. 7.35 – पैसे बुडीत प्रकरणातील फिरोज शेख, नितेश सारडा या दोघांनाही पोलिसांनी न्यायालयात हजर केले. त्यानंतर या तिघांचीही एकत्रित सुनावणी सुरू झाली.

भाजप समर्थकांना सात खून माफ आहेत का? प्रकरण आत्महत्येचे, भाजपला आठवण आणीबाणीची
वास्तुविशारद अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी अर्णब गोस्वामी याला अटक झाली असताना भाजप नेत्यांनी यातही राजकारण करण्याची संधी सोडली नाही. अर्णब गोस्वामी याच्या अटकेमुळे लोकशाहीची गळचेपी झाल्याची आवई उठवत आणीबाणीची स्थिती निर्माण झाल्याचा साक्षात्कार या नेत्यांना झाला. महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांनी त्याला चोख प्रत्युत्तर देत कायद्यानुसार कारवाई केली जात असून देशात भाजप समर्थकांना सात खून माफ आहेत काय, असा सवालच केला.

कायद्याप्रमाणे कारवाई करतील
कायद्यापेक्षा कोणीही मोठे नाही. त्यानुसार पोलीस कारवाई करतील. केस बंद झाली होती, मात्र अन्वय नाईक यांच्या पत्नीने कोर्टात अर्ज केला. त्यानुसार केस रिओपन करण्याची परवानगी कोर्टाने दिली, अशी प्रतिक्रिया गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

आरोपीसाठी केंद्रीय मंत्री येतात
अन्वय नाईक यांच्या आत्महत्येत आरोपी असलेल्या अर्णब यांच्या बचावासाठी केंद्रातील मंत्री येत असतील तर या देशात भाजप समर्थकांना सात खून माफ आहेत का? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला.

फडणवीसांनी अन्याय केला
गेली दोन वर्षे या प्रकरणात देवेंद्र फडणवीस सरकारने कारवाई न करता नाईक कुटुंबावर अन्याय केला. या कुटुंबावर प्रचंड दबाव आणला गेला. त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी सरकार करीत आहे, असे काँग्रेस प्रवत्ते सचिन सावंत यांनी म्हटले आहे.

कटाचा भंडाफोड केल्याची शिक्षा
जातीय हिंसा भडकवण्याचा प्रयत्न करणाऱयांसोबत असणाऱया काँग्रेसच्या प्रत्येक कटाचा भंडाफोड केल्याची शिक्षा अर्णब यांना भोगावी लागत आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडून करण्यात आली आहे.

नाईक परिवाराला न्याय मिळाला पाहिजे
नाईक परिवाराला न्याय मिळालाच पाहिजे. 1974 साली इंदिरा गांधी यांच्या काँग्रेसने देशात आणीबाणी जाहीर केली होती. आता पुन्हा सूडबुद्धीने कारवाई करण्यात आल्याने आणीबाणीचे चित्र आहे, अशी टीका भाजप आमदार आशीष शेलार यांनी केली.

लोकशाहीची गळचेपी करणारी घटना
जी केस 2018 सालीच बंद झाली होती, ती केकळ सूडाच्या भाकनेने पुन्हा उघडली गेली. ही लोकशाहीची गळचेपी करणारी घटना आज घडली आहे. मी भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणून या घटनेचा तीक्र निषेध क्यक्त करतो, अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली.

महाराष्ट्रात कायद्याचे राज्य – संजय राऊत
महाराष्ट्रात कायद्याचं राज्य आहे. इथे कायद्यानुसारच कारवाई केली जाते. एखाद्याविरोधात पुरावे असतील तर पोलीस कारवाई करतात. त्याप्रमाणेच अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात मुंबई पोलिसांच्या हाती काही पुरावे लागले असतील, त्यामुळे पोलिसांनी ही कारवाई केली असेल. महाराष्ट्रात ठाकरे सरकारची स्थापना झाल्यापासून सूडभावनेने कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही, अशी प्रतिक्रिया देतानाच गोस्वामी यांनी गेल्या काही महिन्यांत आपल्या चॅनेलवरून राज्य सरकारवर अनेक खोटे आरोप केले आहेत. त्या आरोपांचीही चौकशी पोलिसांनी करावी, अशी मागणीही शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केली आहे.

काँग्रेसने लोकशाहीला लाज आणली
अर्णब गोस्वामी यांच्या अटकेचे पडसाद दिल्लीतही उमटले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ट्विट करीत ‘काँग्रेस आणि त्यांच्या सहकाऱयांनी पुन्हा एकदा लोकशाहीला लाज आणली आहे. राज्याकडून रिपब्लिक आणि अर्णब गोस्कामी यांच्या विरोधात होणारा सत्तेचा गैरकापर हा लोकशाहीचा चौथा खांब आणि व्यक्तिस्वांतंत्र्याकरील हल्ला आहे. यामुळे पुन्हा एकदा आणीबाणीची आठकण झाली आहे’ असे म्हटले आहे. पाठोपाठ भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनीही ट्विट करीत अर्णबच्या अटकेबद्दल खेद व्यक्त केला. राज्य सरकारच्या अधिकारांचा केलेला दुरुपयोग जनता कधीही माफ करणार नाही, असे नड्डा यांनी म्हटले आहे.

पत्रकारितेची झूल पांघरणाऱयांची पाठराखण आम्ही करू शकत नाही!

रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अटकेचा निषेध करता येणार नाही. हे प्रकरण व्यक्तिगत असून त्याचा पत्रकारितेशी दुरान्वयाने संबंध नाही. त्यामुळे अर्णब यांची अटक म्हणजे चौथ्या स्तंभावरचा हल्ला वगैरे म्हणणे अयोग्य ठरेल. पत्रकारितेची झूल पांघरून वाट्टेल तसे उद्योग करणाऱयाची पाठराखण आम्ही करू शकत नाही’, अशी भूमिका अर्णब गोस्वामी यांच्या अटकेनंतर मराठी पत्रकार परिषद आणि पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीने घेतली आहे.

अन्य पत्रकार संघटनांनीही अर्णब यांच्या अटकेचे समर्थ केले. ‘टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशन’नेही गोस्वामी यांना झालेली अटक एका व्यक्तिगत प्रकरणातून आहे. पत्रकारितेशी त्याचा संबध नाही. कायद्यासमोर सगळे समान असतात. त्यामुळे कायद्याला आपले काम करू द्या, न्यायव्यवस्थेतून सत्य जनतेसमोर येईलच. आम्ही पत्रकार म्हणून सत्यासोबत आहोत, असे असोसिएशनने म्हटले आहे.

अर्णब गोस्वामीविरोधात मुंबईत गुन्हा दाखल; पोलिसांसोबत हुज्जत घालत सरकारी कामात अडथळा आणला
अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात अटक करायला गेलेल्या पोलीस पथकांशी हुज्जत घालत सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी अर्णब गोस्वामी व पोलिसांना विरोध करणाऱ्या त्याच्या कुटुंबातील सदस्यांविरोधात ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस गोस्वामी यांच्या घरी गेले होते तेव्हा अर्णब यांनी हुज्जत घातली, पकडू नये यासाठी अकांडतांडव केला. अर्णब यांच्या पत्नी, मुलगा तसेच अन्य दोघा सदस्यांनीदेखील पोलिसांना आडकाठी करत पोलिसांना त्यांचे काम करण्यात अडथळा निर्माण केला. पोलिसांनाच धक्काबुक्की करण्यात आली, त्यांची कागदपत्रे फाडण्यात आली. त्यामुळे ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात अर्णब व त्यांच्या कुटुंबातील अन्य सदस्यांविरोधात भादंवि कलम 353, 504, 506, (34) अन्वये गुन्हा दाखल झाला आहे.