मालिकेत खेळू; पण हस्तांदोलन मात्र नाही! दक्षिण आफ्रिकन क्रिकेटपटूंना कोरोनाचा धसका

जगभरातील 100 देशांत पसरलेल्या जीवघेण्या कोरोना विषाणूंचा हिंदुस्थान दौऱयावर येणाऱया दक्षिण आफ्रिकन क्रिकेट संघानेही मोठा धसका घेतलाय.आम्ही हिंदुस्थानात वन डे मालिका ठरल्याप्रमाणे खेळू, पण हिंदुस्थानी खेळाडूंपासून मात्र दोन हात दूर राहू. त्यांच्याशी हस्तांदोलन करणार नाही असा संदेश दक्षिण आफ्रिकन क्रिकेट प्रशिक्षक मार्क बाऊचर यांनी बीसीसीआयला दिला आहे.

क्रिकेट सामना संपल्यावर दोन्ही संघांतील खेळाडू, प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफ एकमेकांशी हस्तांदोलन करतात. हे केल्यामुळे खेळभावना चांगल्या पद्धतीने राखली जाते आणि खेळातील वैर विसरण्यास मदतही होते. पण आता तर इंग्लंडच्या संघाने हस्तांदोलन करण्यास नकार दिल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यापाठोपाठ कोरोनाच्या भीतीने दक्षिण आफ्रिकेच्या संघाने हिंदुस्थानी संघाबरोबर हात मिळवण्यास नकार दिल्याचे वृत्त आहे.

आपली प्रतिक्रिया द्या