सामना ऑनलाईन । श्रीनगर
जम्मू कश्मीरमध्ये शनिवारी रात्री सीआरपीएफच्या जवानाने आपल्या दोन सहकर्मार्यांना गोळी मारून स्वतःवरही गोळी झाडली. सदर घटना श्रीनगरच्या बाहरी भागातली असून पंथा कॅम्पमध्ये जवान मुकेश बाबू आणि त्याच्या साथीदारांमध्ये काही कारणास्तव वाद झाला होता. हा वाद इतका वाढला की मुकेश बाबूने आपल्या साथीदारांवर गोळीबार केला आणि स्वतःवरही गोळी झाडून घेतली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आपल्या सहकर्मचार्यांना जखमी केल्यानंतर मुकेश बाबूने शौचालयात स्वतःला कोंडून घेतले. त्यानंतर आपल्याकडी सर्व्हिस रायफलने स्वतःवर गोळी झाडली. सर्व जखमींना आनन फाननमधील इस्पितळात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
सैन्यदलातील जवानांनी असे गोळीबार करणे ही नवी बाब नाही. डिसेंबर २०१८ मध्ये छत्तीसगडमध्येही एका जवानाने आपल्याच बंदुकीची गोळी झाडून आत्महत्या केली होती. लखनौमध्येही एका जवानाने अशाच प्रकारए आत्महत्या केली होती.
जवानांच्या वाढलेल्या आत्महत्येप्रकरणी गृहमंत्रालयाने स्पष्टीकरणही दिले होते. मंत्रालयाने सांगितले होते की, सुरक्षा दलात जवानांच्या आत्महत्येचे कारण बहुतांश वेळा कौटुंबिक वाद, वैवाहिक आयुष्य सारखी आहेत. या समस्येला उपाय म्हणून सरकारने सैन्य दलात योग अनिवार्य केले होते.




























































