दादरमध्ये जलवाहिनी फुटली; शुक्रवारी दादर, वडाळा, लालबाग, परळ, काळाचौकीत पाणी नाही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दादर (पूर्व) मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावर पारसी जिमखाना समोर 1200 मिमी व्यासाची (न्यू तानसा) जलवाहिनी फुटल्यामुळे जलवाहिनी दुरुस्तीचे काम जलकामे विभागाद्वारे युद्धपातळीवर सुरू आहे. त्यामुळे शुक्रवार 8 जुलैला एफ/उत्तर आणि एफ-दक्षिण विभागातील काही ठिकाणी पहाटे 4 ते सकाळी 10 या वेळेत पाणीपुरवठा होणार नाही.

एफ / उत्तर विभाग
दादर पूर्व, माटुंगा, वडाळा, पारसी कॉलनी, हिंदू कॉलनी.

एफ/दक्षिण विभाग
दादर, नायगाव, लालबाग, वडाळा, परळ, काळाचौकी, शिवडी.