
मेष (ARIES – Tuesday, November 29, 2022)
वेळेचा उपयोग, भविष्यातील नियोजन याकरिता आजचा दिवस राखून ठेवाल. सत्कर्माची कास धरा. आदित्यह्रदय स्तोत्राचे वाचन करा. पांढऱ्या रंगाचा पोषाख परिधान कराल. आजचा दिवस शांततामय असेल. नशिबाची साथ मिळेल. नकारात्मक विचार दूर होतील. शिवाचा 108 वेळा नामजप करा. घरात सायंकाळी धूप दाखवा.
शुभरंग : पोपटी
वृषभ (TAURUS -Tuesday, November 29, 2022)
जे लोकं पूर्वी विचित्र वागायचे ते तुमच्या मनासारखे वागतील. आयुष्यातील महत्त्वाच्या व्यक्तिंचा योग्य उपयोग करून घ्या. बारीकसारीक गोष्टींमुळे स्वत:ची चिडचिड करून घेऊ नका. एखाद्या व्यक्तिशी संबंध सुधरवण्यासाठी आजचा दिवस योग्य आहे. मारुतीचे दर्शन घेऊन मारुती स्तोत्राचे वाचन करा. अचानक धनलाभाची शक्यता आहे.
शुभरंग : मोरपिसी
मिथुन (GEMINI – Tuesday, November 29, 2022)
शिवमंदिरात जाऊन शिवाचे दर्शन घ्या. सावधपणे एकेक पाऊल टाकावे लागेल. कोणाकडूनही जास्त अपेक्षा करणे टाळलेले बरे. खात्रीचे लोक थोडे विचित्र वागण्याची शक्यता आहे. कुटुंबात सुख-शांती वाढेल. मनातील भीती दूर होईल. जोडीदाराच्या सल्ल्याने कामाला सुरुवात केल्यामुळे फायदा होईल. गणपतीला दूर्वी वाहा.
शुभरंग : चॉकलेटी
कर्क (CANCER – Tuesday, November 29, 2022)
पंचमुखी मारुती स्तोत्र वाचा. कटकटीचा कंटाळा येण्याची शक्यता आहे. मन विचलित करणाऱ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करा. कोणाशीही भांडण करू नका. एकाग्रता साधण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. मनातील ताणतणाव दूर होतील. कोणालाही पैसे उधार देऊ नका. शिवमंदिरात जाऊन दूध-पाण्याचा अभिषेक करा. आवडत्या रंगाचा पोशख परिधान करा.
शुभरंग : खाकी
सिंह (LEO – Tuesday, November 29, 2022)
कोणालाही पैसे उधार देऊ नका. बोलताना समजून-उमजून बोला. काम करताना शारीरिक दुखापत होणार नाही, याची काळजी घ्या. स्वत:कडे लक्ष द्या. कार्यालयात मिळून-मिसळून वागाल. आर्थिकदृष्ट्या आजचा दिवस लाभदायक आहे. प्रवासात काळजी घ्या. बोलताना विचार करून बोला.
शुभरंग : हिरवा
कन्या (VIRGO – Tuesday, November 29, 2022)
रागाने कोणाशीही बोलू नका. गुलाबी रंगाचा पोषाख परिधान कराल. घरात सकाळी गणपतीची आरती करा. आहारातील पथ्ये पाळावी लागतील. रामरक्षा-मारुती स्तोत्राचे वाचन करा. जोडीदाराकडून अनपेक्षित लाभ होण्याची शक्यता आहे. कुटुंबियांबरोबर छोट्या सहलीला जाण्याचा प्लान आखाल. आजचा दिवस आनंदात जाईल.
शुभरंग : आकाशी
तूळ (TULA- Tuesday, November 29, 2022)
विरोधक नमते घेतील. रखडलेली कामे हटकून पूर्ण कराल.मनाविरुद्ध घडले तरी ते तुमच्यासाठी आवश्यकच होते असा विचार करा. सकारात्मक राहा. कामाकडे लक्ष केंद्रित करा. सोयीसुविधांकरिता पैसे जास्त प्रमाणात खर्च होण्याची शक्यता आहे. करियरमध्ये प्रगती करिता प्रयत्न करावे लागतील. बदामी रंगाची साडी नेसाल.
शुभरंग : पांढरा
वृश्चिक ( SCORPIO – Tuesday, November 29, 2022)
मनातील नकारात्मक विचार दूर होतील. गरिबाला दुधाचे दान करा. गणपतीचे दर्शन घ्याल. दत्तगुरु अथाव श्री विष्णूंची उपासना करा. धनप्राप्तीसाठी केलेले प्रयत्न यशस्वी होतील. बोलताना मधुरावाणीचा वापर करा. कोणाचेही मन दुखावले जाणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. आराध्यदेवतेला मनापासून नमस्कार करून मनाताली इच्छा सांगा.
शुभरंग : गुलाबी
धनु (SAGITTARIUS – Tuesday, November 29, 2022)
मन आनंदी राहिल. आपल्याच मतांवर अडून राहण्याऐवजी इतरांच्या मतांचा आदर करायला शिका. प्रवास लाभदायक होईल. गायीला ताजी पोळी खाऊ घाला. शिवकवच स्तोत्र वाचा. कष्ट करण्याची सवय कधीही सोडू नका. हातातले काम पूर्ण करा. त्याचे फळ लगेच नाही, तरी कालांतराने नक्की मिळेल. विश्वास ठेवा. आजचा दिवस उत्तम आहे.
शुभरंग : लाल
मकर ( CAPRICORN – Tuesday, November 29, 2022)
शनि देवाचे दर्शन घ्या. भविष्य चांगलेच आहे, याची खात्री बाळगा. चिंता सोडा. मिळालेल्या छोट्या छोट्या संधीचेसुद्धा चीज करा. अनावश्यक विचार करू नका. चांगली बातमी कानी येण्याची शक्यता आहे. मित्रांच्या संगतीत अनावश्यक वेळ वाया घालवू नका. सरकारी अधिकाऱ्यांची मदत लागण्याची शक्यता आहे. ओम नम: शिवाय हा नामजप 108 वेळा करा.
शुभरंग : निळा
कुंभ (AQUARIUS – Tuesday, November 29, 2022)
अन्नदान करा. काटकसरीने वागावे लागेल. लोकं तुम्हाला समजून घेतील. घरातील अव्यवस्थित सामान जागच्या जागी लावून ठेवा. मनाला शांतता लाभेल. कुटुंबियांची तुमच्या कामाला मदत मिळेल. नातेवाईकांपासून सावध राहावे लागेल. पक्ष्यांना दाणे खाऊ घाला. कलेतील कौशल्य वाढीस लागेल.
शुभरंग : क्रीम
मीन (PISCES – Tuesday, November 29, 2022)
करियरमध्ये सुधारणा होईल. गायीला पोळी खाऊ घाला. घरातील लहान मुलांची काळजी घ्या. विष्णुसहस्त्र नामाचे वाचन करा. आजचा दिवस आपल्यासाठी आनंददायी आहे. मित्रमैत्रिणींची भेट होईल. आजी-आजोबांकडून भेटवस्तू मिळेल. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. कुटुंबातील लहान मुलांच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल.
शुभरंग : सोनेरी