दाऊदचा पुतण्या रिझवान कासकरला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन। मुंबई

कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याचा पुतण्या रिझवान कासकरला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. खंडणी मागण्याच्या आरोपाखाली रिझवानला मुंबई क्राईम ब्रांचच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे. आपल्याला अटक होऊ शकते याची कुणकुण लागल्याने रिझवान परदेशी पळून जाण्याच्या तयारीत होता. पण मुंबई पोलिसांनी वेळीच त्याच्या मुसक्या आवळल्या.

रिझवान हा दाऊदचा भाऊ इकबाल कासकर याचा मुलगा आहे. याआधी खंडणी विरोधी पथकाने अहमद रजा याला अटक केली होती. तो रिझवानच्या संपर्कात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.