आईने वेळीच ओळखली लक्षणे, नाहीतर….नैराशाबाबत दीपिकाने केला मोठा खुलासा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अभिनेत्री दीपिका पदुकोन मानसिक आरोग्याच्या जनजागृतीसाठी कित्येक वर्षांपासून काम करत आहे. दीपिकानेही एकेकाळी नैराश्याचा सामना केला आहे. ती सध्या तामिळनाडूतील तिरुवल्लूर येथे आहे. 10 ऑक्टोबर रोजी जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त तिच्या मेंटल हेल्थ फाउंडेशन लाइव्ह-लव्ह-लाफच्या एका कार्यक्रमात मानसिक आरोग्याबाबत ती बोलत होती. यावेळी तिने मानसिक आरोग्य आणि त्याला कसे सामोरे जावे आणि त्याची काळजी कशी घ्यावी याबद्दल सांगितले.

दीपिकानेदेखील नैराश्याची झुंज दिली आहे. त्यातून बाहेर पडल्यानंतर तिने मानसिक आरोग्याबाबत जनजागृतीची मोहीम सुरु केली. या कार्यक्रमात दीपिकाला नैराश्यात असताना तिच्या कुटुंबाची काय भूमिका होती असा प्रश्न विचारला असता ती म्हणाली, ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. माझ्या आईने माझ्यातली लक्षणे ओळखली, तिची यात महत्त्वाची भूमिका होती.

दीपिकाने 2015 मध्ये तिच्या मानसिक आजाराबद्दल खुलासा केला होता आणि सांगितले होते की, ती नैराश्याशी झुंज देत असून तिने मदत मागितली होती. दीपिका स्वत: नैराश्यामधून गेली आहे. यानंतर तिने द लिव्ह लव्ह लाइफ फाऊंडेशनची स्थापना केली. ज्या माध्यमातून ती मानसिक आरोग्याबाबत जनजागृती करत असते.

एका अन्य कार्यक्रमात नैराश्याबद्दल बोलताना दीपिकाने एनडीटीव्हीला सांगितले की, “माझे आई-वडील बंगळुरूमध्ये राहतात आणि जेव्हा ते मला भेटायला यायचे,त्यावेळी मी नेहमीच बरी आहे आणि सर्व काही ठीक आहे असे भासवायची. मात्र एकदा असेच आई-वडील भेटायला येऊन घरी परतत होते तेव्हा मला रडू फुटले. मग आईने मला काही प्रश्न विचारले.. तेव्हा मला उदासिन आणि निराशाजनक वाटत होते,मात्र त्यावेळी मला असे वाटले की, देवाने त्यांना माझ्यासाठीच पाठवले आहे.