पुरुष आयोगासाठी जंतर मंतरवर आंदोलन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन। नवी दिल्ली

आंतरराष्ट्रीय पुरुष दिनाच्या पूर्वसंध्येला नवी दिल्लीतील जंतर मंतर येथे पुरुष संघटनांनी जोरदार आंदोलन केले. यावेळी पुरुष आयोगाच्या स्थापनेबरोबरच , मुलांच्या पालन पोषणाची संयुक्त जबाबदारी व कुटुंबाच्या जबाबदाऱ्यांचे समान वाटप करण्यात यावे व अशी मागणी आंदोलकांनी केली. सेव्ह इंडीयन फॅमिली (SIFF) या स्वयंसेवी संस्थेबरोबरच अनेक पुरुष संघटना या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.

या देशात प्राण्यांसाठी आयोग आहे पण पुरुषांसाठी नाही. यामुळे देशातील पुरुषांना जगणेच अशक्य झाले असून त्यांना आरोपीचे आयुष्य व्यतित करावे लागत आहे. यामुळे कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक छळ विरोधी कायदा व कौटुंबीक हिंसाचार प्रतिबंधक कायद्याप्रमाणेच स्त्री पुरुष समानतेसाठीही कायद्याची तरतूद करावी अशी मागणी आंदोलनातील पुरुष संघटनांनी केली. तसेच यावेळी मुलांचा ताबा वडिलांकडेही देण्याबद्दल विचार करावा अशी विनंतीही आंदोलकांनी पंतप्रधान कार्यालयाला दिलेल्या निवेदनात केली आहे.