
पोलिसांनी पकडलेल्या टँकरमधील डिझेल चोरून नेण्याचा प्रयत्न करणाऱया कॉन्स्टेबलसह पाचजणांविरोधात पाथर्डी येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कॉन्स्टेबल दीपक शेंडे, विष्णू बाबासाहेब ढाकणे, भागवत काशिनाथ चेमटे, असिफ रफिक शेख, दीपक आरोळे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
शेकटे शिवारात 26 डिसेंबर रोजी पोलिसांनी डिझेलने भरलेला टँकर पकडून पोलीस ठाण्याच्या आवारात आणून लावला होता. शुक्रवारी पहाटे या टँकरशेजारी भागवत चेमटे, असिफ शेख, दीपक आरोळे व कॉन्स्टेबल दीपक शेंडे यांनी दुसरा टँकर आणून लावला. टँकरमधील डिझेल ते इंजिन लावून दुसऱया टँकरमध्ये भरत होते. इंजिनचा आवाज ऐकून पोलीस नाईक ईश्वर गर्जे टँकरजवळ आले असता शेख व आरोळे हे पळून गेले, तर शेंडे पोलीस स्टेशनमध्ये निघून गेला. पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण यांनी एक पथक पाठवून चेमटे याला ताब्यात घेतले. चेमटे याने आम्ही हा प्रकार पंपचालक विष्णू ढाकणे याच्या सांगण्यावरून केल्याचे सांगितल्यानंतर गर्जे यांनी फिर्याद दिली आहे.



























































