दुसऱ्यांच्या कल्याणासाठी झटणे हाच खरा जीवनधर्म

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> डॉ. समिरा गुजर-जोशी
धवलयति समग्रं चन्द्रमा जीवलोकं। किमिति निजकलङ्कं नात्मसंस्थं प्रमाष्टि।
भवतु विदितमेतत् प्रायश सज्जनानां। परहितनिरतानामादरो नात्मकार्ये।।
चंद्र संपूर्ण प्राणिमात्रांच्या जगाला उजळवतो; मग स्वतवर असलेला डाग का पुसून टाकत नाही? याचे कारण असे समजावे की, इतरांच्या हितासाठी सदैव झटणाऱया सज्जनांना सामान्यत स्वतच्या हिताच्या कामांकडे विशेष लक्ष नसते.
चंद्राप्रमाणे, जो खऱया अर्थाने सज्जन असतो, तो स्वतपेक्षा इतरांच्या हिताचा अधिक विचार करतो. परोपकार, निस्वार्थ सेवा आणि दुसऱयांच्या कल्याणासाठी झटणे हेच त्याचे जीवनधर्म असतात; स्वतच्या उणिवा किंवा दुःखांची तो फारशी पर्वा करत नाही.