
याआधी संत्र्याच्या आडून 1476 कोटी अमली पदार्थांची तस्करीचे प्रकरण ताजे असतानाच आता नाशपाती, हिरव्या सफरचंदाच्या नावाखाली दक्षिण आफ्रिकेतून आयात करण्यात आलेल्या एका पंटेनरमधून 500 कोटींहून अधिक किमतीचा अमली पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला आहे. जेएनपीटी बंदरात मुंबई डीआरआय विभागाने कारवाई केल्याची माहिती डीआरआय सूत्रांनी दिली.
याआधी या महिन्याच्या सुरुवातीलाच एजन्सीने संत्र्यांच्या एका खेपेतून 198 किलो मेथ आणि 9 किलो कोकेन असा 1476 कोटी किमतीचा अमली पदार्थांचा साठा जप्त केला होता. याप्रकरणी अटक करण्यात आलेले आरोपी व गुप्त खबऱ्याकडून मुंबईच्या डीआरआय विभागाच्या अधिकाऱ्यांना पक्की खबर मिळाली होती. या माहितीच्या आधारे डीआरआय अधिकाऱ्यांनी गुरुवारी जेएनपीटी बंदरातून दक्षिण आफ्रिकेतून आयात होत असलेल्या नाशपाती आणि हिरवी सफरचंद घेऊन जाणारा पंटेनर अडवला. पंटेनरमधील मालाची तपासणी केली असता त्यात ड्रग्जसाठा सापडला.
हिरव्या सफरचंदांच्या बॉक्समध्ये कोकेनच्या प्रत्येकी अंदाजे एक किलो वजनाच्या विटा लपविल्याचे निदर्शनास आले. अधिक तपासणी केल्यानंतर कोकेनच्या 50.23 किलो वजनाच्या 50 विटा जप्त करण्यात आल्या आहेत. या अमली पदार्थांच्या साठय़ाची किंमत 502 कोटी रुपये आहे.






























































