ऑनलाईन विकण्यात येणाऱ्या वस्तुंपैकी 20 टक्के नकली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

सध्या ऑनलाईन शॉपिंगचं प्रमाण खूपच वाढलं आहे. अगदी छोट्या छोट्या गोष्टींसाठीही लोक ऑनलाईन वेबसाईट्सचा शोध घेतात. पण, या ऑनलाईन साइट्सवर विक्रीला येणाऱ्या वस्तुंपैकी 20 टक्के वस्तू या नकली असल्याचं समोर येत आहे.

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, ऑनलाईन शॉपिंग वेबसाईटमधून विकला जाणाऱ्या उत्पादनांपैकी 20 टक्के उत्पादनं ही नकली असल्याचं एका सर्वेक्षणातून समोर आलं आहे. यात प्रामुख्याने विविध प्रकारचे सुगंध, सौंदर्य प्रसाधने, खेळाचे साहित्य आणि बॅगांचा समावेश आहे. या सर्वेक्षणात त्यांनी कोणत्या वेबसाईटवर किती प्रमाणात नकली वस्तू मिळतात, त्याचीही आकडेवारी या सर्वेक्षणात देण्यात आली आहे. स्नॅपडीलसाठी 37 टक्के, फ्लिपकार्टसाठी 22 तर अॅमेझॉनसाठी 20 टक्के उत्पादनांवर खराब असल्याच्या प्रतिक्रिया आल्याचं या सर्वेक्षणात नोंदवण्यात आलं आहे.

या वेबसाईट्सवर मिळणाऱ्या वस्तू या खराब आहेत किंवा नाही, हेही अनेक ग्राहकांना लक्षात न आल्याचं या सर्वेक्षणात म्हटलं आहे. कारण, या वस्तू हुबेहूब अस्सल वस्तूंसारख्याच दिसतात. त्यामुळे दोघांमधला फरक ओळखता येत नाही. त्यामुळे अशा वस्तू ओळखणं हे या वेबसाईट्ससमोरचं एक मोठं आव्हान असल्याचंही या सर्वेक्षणात नमूद करण्यात आलं आहे.

summary- e tailers sold fake goods says a survey