शिक्षणतज्ञ डॉ. अरुण निगवेकर यांचे निधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ज्येष्ठ शिक्षणतज्ञ, विद्यापीठ अनुदान आयोगाचे (यूजीसी) माजी अध्यक्ष आणि भौतिकशास्त्रज्ञ डॉ. अरुण निगवेकर यांचे दीर्घ आजारामुळे आज दुपारी पुणे येथील निवासस्थानी निधन झाले. त्यांचे वय 79 वर्षे होते. देशाच्या उच्च शिक्षण क्षेत्रात अद्ययावत तंत्रज्ञान आणण्यात डॉ. निगवेकर यांचा मोलाचा वाटा होता.

डॉ. निगवेकर यांनी शिक्षण क्षेत्रातील अनेक महत्वाच्या संस्थांमध्ये उच्च पदांवर काम केले होते. 1998 ते 2000 या काळात ते पुणे विद्यापीठाचे कुलगुरू होते. त्यानंतर 2000 ते 2005 या कालावधीत त्यांनी यूजीसीचे उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पाडली होती. नॅशनल असेसमेंट अॅण्ड ऑक्रिडेशन कौन्सिलची (नॅक) स्थापना करण्यात डॉ. निगवेकर यांची महत्वाची भूमिका होती. शिक्षण क्षेत्रातील केंद्र सरकारच्या विविध समित्यांवरही त्यांनी काम केले होते.