तरुणाने खासदाराच्या डोक्यावर फोडले अंड, व्हिडीओ व्हायरल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । क्विन्सलॅण्ड

न्यूझीलंडमध्ये मशिदीत झालेल्या भयंकर गोळीबारावरून वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या खासदाराच्या डोक्यावर एका तरुणाने अंड फोडले आहे. या घटनेचा एक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

ऑस्ट्रेलियातील सत्ताधारी पक्षाचे खासदार फ्रेसर अॅनिंग यांनी ख्राईस्टचर्च येथे झालेल्या हल्ल्यासाठी न्यूझीलंडमधील वाढत्या मुसलमानांच्या संख्येला जबाबदार धरले होते. त्यांच्या या वक्तव्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी देखील फ्रेसर यांचे वक्तव्य बेजबाबदार आणि घाणेरडे असल्याचे म्हटले होते. त्यानंतर या वक्तव्याविषयी स्पष्टीकरण देण्यासाठी फ्रेसर प्रसारमाध्यमांसमोर आले. त्यावेळी त्यांच्या मागे उभ्या असलेल्या एका तरुणाने त्यांच्या डोक्यावर अंड फोडलं. त्यानंतर फ्रेसर यांनी त्या तरुणाला कानाखाली मारली. ही हाणामारी वाढणार हे लक्षात येताच आजुबाजुच्या लोकांनी मध्यस्थी करून फ्रेसर यांना शांत केले.