बिहारमध्ये माओवादी आणि सैन्यांत चकमक, शस्त्रसाठा जप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रतिकात्मक फोटो

बिहारमध्ये माओवादी आणि हिंदुस्थानी सैनिकांमध्ये चकमक उडाली. या चकमकीनंतर सैन्याने मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा आणि दररोजच्या वापरातील वस्तू जप्त केल्या आहेत.

बिहार झारखंडच्या सीमेवर गिद्धेश्वर पर्वत रांगात माओवादी लपल्याची माहिती हिंदुस्थानी सैनिकांना मिळाली. त्यानुसार सैनिकांनी या भागात शोधमोहीम राबवली. सैनिक दिसताच माओवाद्यांनी सैनिकांवर गोळीबार केला. उत्तरादाखल सैनिकांनीही माओवाद्यांवर गोळीबार केला आणि चकमक उडाली.

बराच वेळ ही चकमक सुरू होती, नंतर माओवाद्यांनी या भागातून पळ काढला. सैनिकांनी या भागाची पाहणी केली असता अनेक ठिकाणी रक्ताचे डाग आढळले. त्यामुळे माओवादी जखमी झाल्याचे किंवा ठार झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सैनिकांनी या भागातून शस्त्रसाठा, रोजच्या वापरातील वस्तू आणि औषधे जप्त केली आहेत.