
सामना ऑनलाईन । अहमदाबाद
गेल्या 24 तासांत काँग्रेसच्या दोन आमदारांनी पक्ष सोडला. त्यापैकी जवाहर चावडा हे भाजपमध्ये दाखल झाले असून परसोत्तम यांनी आपले पत्ते अजून राखीव ठेवले आहे. तर चावडा यांना भाजपमध्ये प्रवेश घेतल्या घेतल्या त्यांना मंत्रिपदाची लॉटरी लागली आहे.
Gandhinagar: MLA Jawahar Chavda who resigned from Congress and joined BJP yesterday, takes oath as a minister in Gujarat government. pic.twitter.com/HBsf0mSAUG
— ANI (@ANI) March 9, 2019
शनिवारी जवाहर चावडा यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. भाजपप्रवेशावेळी मंत्रिपदाची ऑफर असल्याचे वृत्त त्यांनी फेटाळले होते. परंतु 24 तासांतच पक्षात प्रवेश करून त्यांना मंत्रिपद मिळाल्याने भाजपमधील काही नेते नाराज होण्याची शक्यता आहे.
भाजपमध्ये या 24 तासात मंत्रिपद मिळवा
काँग्रेस नेता भाजपमध्ये येऊन त्याला लगेच मंत्रिपद मिळणे ही बाब तशी गुजरामध्ये नवीन नाही. गेल्या वर्षी जुलै मध्ये काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि आमदार कुंवरजी बावलिया यांनीही भाजपमध्ये प्रवेश केल्यावर 24 तासात त्यांना मंत्रिपद बहाल करण्यात आले होते.त्यावेळी भाजप आमदार मधू श्रीवास्तव यांनी आपली नाराजी जाहीरणे व्यक्त केली होती.
काँग्रेस आमदार २४ तासाच्या आत भाजपचा मंत्री, निष्ठावंत वैतागले
काँग्रेसमध्ये राहून लढाई लढणार
तर दुसरीकडे अल्पेश ठाकोर यांनी भाजप प्रवेशाचे वृत्त फेटाळले असून पक्षातच राहणार असल्याचे म्हटले आहे. तसेच पक्षात राहूनच आपण आपली लढाई लढणार असल्याचे ठाकोर यांनी म्हटले.
Alpesh Thakor,Congress MLA on reports that he is joining the BJP: I am going to continue to fight for my people. I will stay in Congress and continue to support the Congress. #Gujarat pic.twitter.com/222kHTZzOX
— ANI (@ANI) March 9, 2019




























































