बँकेतून बोलत असल्याचे सांगून माजी सैनिकाला गंडा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बँकेतून बोलत असल्याचे सांगून एका माजी सैनिकाची पाच लाख 93 हजार 897 रुपयांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रवींद्रपाल जसवंत सिंग (वय 58, रा. जामखेड रोड, नगर) असे माजी सैनिकाचे नाव आहे. रवींद्रपाल सिंग यांच्या मोबाईलनंबरवर सोमवारी दुपारी एका अनोळखी मोबाईल नंबरवरून फोन आला. समोरच्या व्यक्तीने एसबीआय, युनो बँक डीपार्टमेंटमधून बोलतोय, असे सांगून, तुमचे युनो एसबीआय अकाउंट बंद झाले आहे. ते चालू करायचे असल्याचे सांगून फिर्यादीचा विश्वास संपादन केला.

युनो एसबीआय अकाउंट चालू करण्यासाठी तुमच्या मोबाईलवर आलेला ओटीपी सांगा, अशी बातावणी करून फिर्यादीकडून ओटीपी घेतला. यानंतर फिर्यादीच्या बँक खात्यातून पाच लाख 93 हजार 897 रुपये काढून घेत फसवणूक केली आहे.