मदत पडली महागात; सोन्याची माळ असल्याचे सांगून दोन लाखाला गंडा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
golden-chain-new
प्रातिनिधिक फोटो

सामना प्रतिनिधी । रत्नागिरी

मला पैशांची गरज असून सोन्यासारखी वाटणारी माळ देत एका भामट्याने माळेच्या बदल्यात दोन लाख रुपये घेऊन पोबारा केला आहे. खोटी माळ देऊन फसवणूक केल्याचे लक्षात येताच संबंधित व्यक्तीने रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली.

विनायक एकनाथ पिलणकर (वय २८) याला एका अज्ञात इसमाने सोन्यासारखे दिसणारे दोन मणी दिले. ‘हे मणी तुमच्याकडे ठेवा, माझ्याकडील आणखी सोने तुम्हाला देतो पण मला पैशाची गरज आहे’, असे त्या अज्ञात इसमाने पिलणकरला सांगितले. त्यानंतर एक दिवस त्या इसमाने विनायक पिलणकर यांना फोन करुन पऱ्याची आळी येथे बोलावले. तिथे विनायक पिलणकर यांना त्या इसमाने त्याच्याकडील २० पदरी साधारण दीड फूट लांबीची एक माळ दिली. ही माळ सोन्याची असल्याचे सांगून विनायक पिलणकर यांच्याकडून दोन लाख रुपये घेऊन पोबारा केला. आपली फसवणूक झाल्याचे दिसून येताच विनायक पिलणकर यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली.