प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक पारस पोरवाल यांची आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईतील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक पारस पोरवाल यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. भायखळा येथील राहत्या इमारतीच्या तेविसाव्या मजल्यावरून उडी मारून पोरवाल यांनी स्वतःचं आयुष्य संपवलं.

दक्षिण मुंबईतले प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अशी पोरवाल यांची ओळख आहे. त्यांनी एकाएकी अशा प्रकारे आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल का उचललं असावं, याचं कारण अद्याप अज्ञात आहे. पोरवाल यांच्याजवळ कोणतीही सुसाईड नोट आढळलेली नाही.

त्यांच्या आत्महत्येने पोरवाल कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. या आत्महत्येने बांधकाम क्षेत्रातही खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा तपास पोलिसांनी सुरू केला असून त्यांच्या निकटच्या वर्तुळात चौकशी करण्यात येत आहे. बांधकाम व्यवसायातील तणावाची पार्श्वभूमी लक्षात घेता त्यांना कोणता ताण होता का, याचाही शोध घेण्यात येत आहे.