फारुख अब्दुल्लांचे विषारी फूत्कार; कश्मिरींना हवे चीनचे शासन, स्वत:ला हिंदुस्थानी मानत नाहीत

जम्मू-कश्मीरचे लोक स्वतःला हिंदुस्थानी समजत नाहीत आणि हिंदुस्थानी नागरिक होण्याची त्यांची इच्छाही नाही. उलट चीनने कश्मीरवर राज्य करावे अशी येथील जनतेची मनापासूनची इच्छा असल्याचे गरळ माजी मुख्यमंत्री डॉ. फारुख अब्दुल्ला यांनी ओकले आहे. जम्मू-कश्मीरमध्ये पुन्हा कलम 370 लागू करण्यात यावे अशी मागणीही त्यांनी केली.

जम्मू-कश्मिरातून कलम 370 हटवताना केंद्र सरकारने तेथील स्थानिक राजकारण्यांना नजरकैदेत ठेवले होते. वर्षभरानंतर नॅशनल कॉन्फरन्सचे नेते तथा माजी मुख्यमंत्री डॉ. फारुख अब्दुल्ला यांची नजरकैदेतून सुटका करण्यात आली. त्यानंतर एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत डॉ. अब्दुल्ला यांनी मोदी सरकारच्या या निर्णयावर टीकेची झोड उठवली. ते म्हणाले, कश्मीरमध्ये कुणालाही जाऊन विचारा, कोणीही आपण हिंदुस्थानी असल्याचे म्हणणार नाही. मोदी सरकारने कलम 370 हटवण्याचा निर्णय घेऊन आत्मघात केला आहे.

कश्मीरी जनतेला मोदी सरकारवर विश्वासच राहिलेला नाही. फाळणीच्या वेळी जनतेने महात्मा गांधींचा हिंदुस्थान निवडला. चीनने तुमच्या सीमा केव्हाच ओलांडल्यात. आता तर कश्मिरी जनतेला चीनने कश्मीरमध्ये यावे असे वाटते

आपली प्रतिक्रिया द्या