
जेवण झाल्यावर मुखशुद्धीसाठी हमखास वापरला जाणारा पदार्थ म्हणजे बडिशेप. बडिशेप हा मसाल्याचा पदार्थ आहे. पण, तो मुखशुद्धीसाठी उत्तम असल्याने जेवणानंतर खाल्ली जाते. पण तुम्हाला माहीत आहे का, बडिशेप ही फक्त मुखवास म्हणूनच उपयोग नाहीतर याचे अनेक औषधी गुणधर्मही आहेत. जसं बडिशेप हे तुमच्या आरोग्यासाठी आणि सौंदर्यासाठीही उपयोगी आहे.
बडिशेपमध्ये भरपूर प्रमाणात क जीवनसत्त्व आढळतं. तसंच बडीशेपमध्ये कॅल्शिअम, सोडियम, फॉस्फरस, आर्यन आणि पोटॅशिअमसारखी आवश्यक खनिजंही असतात. त्यामुळे रोजच्या आहारात किंवा आहारानंतर बडिशेपचं सेवन करणं उत्तम आहे. पण बडिशेप फायदेशीर असते म्हणून तिचे अतिसेवन करणे चांगले नाही. जेवणानंतरही ठराविक प्रमाणातच बडिशेप खावी.
बडिशेप खाण्याचे फायदे –
बडिशेप खाल्ल्याने तोंडाच दुर्गंधी कमी होते. त्यामुळे बरेचदा मुखवास म्हणून याचा वापर केला जातो.
रक्तदाबावरही बडिशेप गुणकारी आहे.
शरीरातील पाण्याचा योग्य प्रकारे निचरा करण्यासाठीही बडिशेपचा उपयोग होतो.
रक्तशुद्धीसाठीही बडिशेप मदत करते.
बद्धकोष्ठता आणि अपचन यावरही बडिशेप गुणकारी आहे.
बडीशेप नियमित खाल्ल्यास तुमची दृष्टीही सुधारण्यास मदत होते.
तुम्हाला जर वजन कमी करायचे असेल तर बडिशेप नक्की खा.
अस्थमासारख्या आजाराची लक्षणे कमी करण्यासही बडीशेप गुणकारी आहे.
स्तनपान करणाऱ्या मातांसाठीही बडिशेप खाणे फायदेशीर असते.




























































