FIFA World Cup 2026 कौतुकास्पद! सामन्यानंतर जपानी चाहत्यांकडून स्टेडियमची स्वच्छता; चिमुकल्यांपासून मोठ्यांनी उचलला कचरा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जपानच्या फुटबॉल चाहत्यांनी आपल्या आगळ्यावेगळ्या कृतीने संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. नेदरलँड्सविरुद्धचा सामना संपल्यानंतर जपानी चाहत्यांनी स्टेडियममध्येच थांबून तिथला सगळा कचरा साफ केला. अगदी चिमुकल्यांपासून थोरा मोठ्यांनी स्टेडियमची साफसफाई केली. सामन्याचा निकाल काहीही लागला, तरी जपानी संस्कृतीमधील ‘आदर आणि शिस्त’ कधीही कमी होत नाही, हेच त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.

2026 च्या फिफा (FIFA) विश्वचषक स्पर्धेत डॅलस (अमेरिका) येथे जपान आणि नेदरलँड्स यांच्यात खेळवला गेलेला सामना 2-2 असा बरोबरीत सुटला. या रोमांचक सामन्यानंतर जपानी समर्थकांनी स्टेडियममध्ये थांबून प्रेक्षक गॅलरीतील कचरा गोळा केला, ज्याचे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. आपली आजूबाजूची जागा नेहमी स्वच्छ ठेवणे आणि निसर्गाचा आदर करणे हा जपानी संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग आहे; आणि याच संस्कृतीचे दर्शन चाहत्यांनी मैदानात घडवले.

ग्रुप ‘एफ’ (Group F) मधील जपान विरुद्ध नेदरलँड हा सामना अतिशय चुरशीचा ठरला. पहिल्या हाफमध्ये दोन्ही संघांना एकही गोल करता आला नाही. मात्र, दुसऱ्या हाफमध्ये सामन्याचा थरार वाढला आणि अखेर सामना 2-2 अशा बरोबरीत संपला. सामना संपताच जपानी चाहत्यांनी कचऱ्याच्या पिशव्या हातात घेतल्या आणि स्टेडियम जसे आधी स्वच्छ होते, तसेच ते पुन्हा चकाचक केले.