लातुरात पाण्यावरून राडा; काठीने डोके फोडले, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । लातूर

पाणी टंचाईमुळे शहरात पाण्याच्या कारणावरुन भांडणे होत असल्याचे दिसत आहे. आर्वी गायरान भागात पाण्याच्या कारणावरुन चौघांनी मारहाण करून काठीने डोके फोडल्याची घटना घडली. या प्रकरणी चार जणांविरुध्द पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

लातूर शहर आणि परिसरात पाण्याची टंचाई तीव्र स्वरुप धारण करीत आहे. पाण्याच्या कारणावरुन शिवीगाळ, मारहाणीच्या घटना घडत आहेत. शहरापासून जवळच असलेल्या आर्वी गायरान परिसरात राहणाऱ्या विशाल सखाराम कसबे याला मारहाण करण्यात आली. 1 एप्रिल रोजी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास फिर्यादी व त्याची पत्नी लता हे सार्वजनिक नळावर पाणी भरत होते. घराच्या शेजारी राहण्यास आलेले गोटू कमलाकर सूर्यवंशी, महादेव भिमा कांबळे, ज्योती महादेव कांबळे, सुरज महादेव कांबळे यांनी या ठिकाणी तुम्ही पाणी भरायचे नाही असे म्हणून शिवीगाळ केली. तसेच लाथाबुक्यांनी मारहाण केली व काठीने मारुन डोके फोडले. फिर्यादीच्या पत्नीसही मारहाण करण्यात आली. एमआयडीसी पोलीस ठाण्यात या मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आले.