
सामना प्रतिनिधी । लातूर
लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये बहुजन समाज पार्टी व समाजवादी पार्टीचे उमेदवार डॉ.सिध्दार्थकुमार सुर्यवंशी यांची लढत ही भाजपाच्या उमेदवारासोबत आहे. काँग्रेस आणि वंचीत विकास आघाडीचे उमेदवार हे डमी उमेदवार आहेत असे पत्रकार परिषदेत उमेदवार डॉ.सिध्दार्थकुमार सुर्यंवशी यांनी सांगीतले.
लातूर लोकसभा मतदारसंघातून भाजपाने आपणास उमेदवारी द्यावी अशी मागणी केली होती परंतू पक्षाने उमेदवारीसाठी विचार केला नाही. बहुजन समाज पक्षाने आपणास उमेदवारी दिली आहे. कार्यकत्र्याला संधी मिळाली पाहिजे हाच विचार ठेऊन मला उमेदवारी देण्यात आली आहे. लातूर लोकसभा मतदारसंघातील जे उमेदवार आहेत त्यामध्ये कामाच्या, गुणवत्तेच्या, शिक्षणाच्या बाबतीत आपणच प्रथम क्रमांकावर आहोत असेही त्यांनी सांगीतले. प्रचारासाठी बसपाच्या प्रमुख मायावती व समाजवादी पार्टीचे अखिलेश यादव लातूरला येणार असल्याचेही त्यांनी सांगीतले. या पत्रकार परिषदेस बसपाचे प्रदेश सचिव प्रा.व्यंकट कसबे, डॉ.अनिल कांबळे यांच्यासह इतरांची उपस्थिती होती. महाराष्ट्रामध्ये बहुजन समाज पार्टी ४४ जागा लढत आहे तर समाजवादी पार्टी ४ जागा लढत असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
































































