
सामना ऑनलाईन । क्लालालंपूर
मलेशियाचे माजी पंतप्रधान नजीब रझाक यांना भ्रष्टाचारविरोधी पथकाने अटक केली आहे. नजीब आणि त्यांच्या कुटुंबीयांवर भ्रष्टाचाराचा आरोप ठेवण्यात आला आहे.
Former Malaysian prime minister Najib Razak arrested by Malaysia’s anti-graft agency. Razak’s name surfaced in the multi billion dollar 1Malaysia Development Berhad (1MBD) scam: Malaysian media pic.twitter.com/LOJWOssN8g
— ANI (@ANI) July 3, 2018
रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी रझाक यांना त्यांच्या राहत्या घरातून भ्रष्टाचारविरोधी पथकाने अटक केली आहे. माजी पंतप्रधान आणि त्यांच्या कुटुंबीयांवर मलेशिया डेव्हलपमेंट बेरहाड (1MBD) या सरकारी कंपनीमध्ये कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या अटकेनंतर नझीब यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले असून यात कोणतेही तथ्य नसल्याचे म्हटले आहे.
मलेशियाचे पंतप्रधान महातीर मोहम्मद यांनी गेल्या महिन्यामध्ये नझीब यांच्याविरोधातील भ्रष्टाचाराच्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी अधिकाऱ्यांचे एक पथक काम करत असल्याचे म्हटले होते. नझीब यांच्यावर मलेशिया डेव्हलपमेंट बेरहाड (1MBD) या सरकारी कंपनीमध्ये ७० कोटी डॉलरचा घोटाळा केल्याचा आरोप करण्याता आला. हा सर्व पैसा त्यांनी आपल्या खात्यामध्ये वळवला असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला.






























































