पंजाबचे माजी मुख्यमंत्री बादल रुग्णालयात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांना पोटाच्या विकारामुळे चंदिगड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोटात आणि पाठीत दुखू लागल्यामुळे त्यांना उलटी झाली. त्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.