मेघालयात सुरक्षा तपासणीदरम्यान चकमक, पोलिसांनाी केलेल्या गोळीबारात चार हल्लेखोर ठार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मेघालयातील पूर्व गारो हिल्स जिल्ह्यात रविवारी सुरक्षा तपासणी मोहिमेदरम्यान पोलीस आणि हल्लेखोरांमध्ये चकमक झाली. चकमकीत पोलिसांनी केलेल्या गोळीबारात चार हल्लेखोर ठार झाले. पोलीस ठार झालेल्या हल्लेखोरांची ओळख पटवण्याचे काम करत आहेत, पूर्व गारो हिल्सचे पोलीस अधीक्षक स्वप्नील पवार यांनी सांगितले.

एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, रविवारी पहाटे 4 च्या सुमारास पूर्व गारो हिल्सच्या सोंगसाक भागात पोलीस तपासणी करत असताना ही घटना घडली. तपासणीसाठी जवळ आलेल्या या चार सशस्त्र हल्लेखोरांनी कर्तव्यावर असलेल्या पोलिसांवर गोळीबार केला. पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात चारही हल्लेखोर जखमी झाले आणि नंतर त्यांचा मृत्यू झाला.