स्वस्त डॉलरच्या नावाखाली फसवणूक; मोबाईल आणि सिमकार्ड केले जप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

स्वस्तात डॉलर देतो, असे सांगून फसवणूक करणाऱया तिघांना नेहरूनगर पोलिसांनी अटक केली. अमीर जमशेद शेख, सिटू अब्बू ताहीर,नसीब मलिक शेख अशी त्या तिघांची नावे आहेत. ते तिघेही मूळचे झारखंडचे रहिवासी आहेत. त्याच्याकडून पोलिसांनी चार मोबाईल आणि 64 सिमकार्ड जप्त केली आहेत.

नवी मुंबई येथे तक्रारदार राहतात. या टोळीने तक्रारदार यांना स्वस्तात डॉलर देतो, असे सांगून एक लाख रुपयाची फसवणूक केली होती. फसवणूक प्रकरणी नेहरूनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला याचा गुह्याचा तपास नेहरू नगर पोलीस करत होते. शनिवारी रात्री नेहरूनगर पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई बोडके हे गस्त करत होते. गस्ती दरम्यान एक जण हा नेहरू नगर येथील बँकेच्या एटीएम जवळ संशयास्पद फिरताना दिसला. त्यामुळे बोडके यांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे एक विदेशी चलन, कागदाचे बंडल आणि चार सिमकार्ड मिळून आले. बोडके यांनी त्याला पोलीस ठाण्यात आणले. त्याच्या चौकशीत आणखी दोघांची नावे समोर आली. त्या तिघांकडून पोलिसांनी एकूण चार मोबाईल आणि 60 सिमकार्ड आणि कागदाची बंडल जप्त केली आहेत. अटक केलेले ते तिघे झारखंडचे रहिवासी आहेत. त्या तिघांनी मुंबईत काही गुन्हे केले आहेत का याचा तपास नेहरूनगर पोलीस करत आहेत.