
महावितरणमधून बोलतोय, तुमचे विजेचे बिल भरले नाही तर वीज पुरवठा खंडित करू असे सांगून नागरिकांची फसवणूक करणाऱया जामतारा टोळीच्या एकाला बीकेसी पश्चिम सायबर पोलिसांनी अटक केली. अजय मंडल असे त्याचे नाव असून तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.
शहरात वीज बिलाच्या नावाखाली नागरिकांच्या फसवणुकीचे प्रकार वाढत होते. वीज बिलाबाबत महावितरणकडे तक्रारी येत होत्या. त्या तक्रारीची दखल घेऊन फेब्रुवारी महिन्यात महावितरणने पश्चिम सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा नोंद केला. पोलीस उपायुक्त हेमराज राजपूत यांनी अधिकाऱयांना तपासाच्या सूचना दिल्या. वरिष्ठ निरीक्षक सुवर्णा शिंदे याच्या पथकातील उपनिरीक्षक घोरपडे, शिंदे आदीने तपास सुरू केला. तपासा दरम्यान पोलिसांना एकाची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांचे पथक हे झारखंड येथे गेले. तेथून पोलिसांनी चरकू मंडलला अटक केली. त्याच्या चौकशीत अजयची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांचे पथक जामतारा येथे गेले. तेथून पोलिसांनी अजयला ताब्यात घेऊन अटक केली. त्याला अटक करून मुंबईत आणण्यात आले. चरकु हा अजयला फसवणुकीसाठी लागणारे नंबर आणून देत असायचा. त्यानंतर अजय हा नागरिकाना वीज बिल अपडेटच्या नावाखाली पह्न करून फसवणूक करत असायचा.

























































