Daily Horoscope – कसा असेल तुमच्यासाठी आजचा दिवस ? वाचा ’16 मे’चे राशीभविष्य

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मेष (ARIES – Tuesday, May 16, 2023)
आजचा दिवस मौजमजा आणि करमणुकीचा आहे. जवळच्या नातेवाईकासोबत मिळून व्यवसाय करण्याचा विचार कराल. स्वत:साठी वेळ काढाल. भेटवस्तूंची देवघेव कराल. लाल बांगड्या किंवा लाल वस्त्राचे मुलींना दान करा. नोकरीत बढती होण्याची शक्यता आहे.
शुभरंग : पोपटी

वृषभ (TAURUS – Tuesday, May 16, 2023)
दररोज पूजा करा. आरोग्य उत्तम राहील. नवीन आर्थिक योजनांचा लाभ घ्या. कोणालाही वचन देण्यापूर्वी विचार करा. नवीन गोष्टी शिकाल. मत मांडताना घाबरू नका. समाजात कौतुक होईल. नव्या कपड्यांची खरेदी कराल.
शुभरंग : निळा

मिथुन (GEMINI – Tuesday, May 16, 2023)
इतरांसोबत आनंद वाटून घ्याल. अनपेक्षित लाभ होण्याची शक्यता आहे. बहिणीशी आपुलकीने वागाल. मद्यपान करू नका. काही दिवसांच्या अबोल्यानंतर जोडीदार पुन्हा प्रेमात पडेल. वेळ वाया घालवू नका.
शुभरंग : आकाशी

कर्क (CANCER – Tuesday, May 16, 2023)
चांदीचा शिक्का खिशात ठेवा. चांगल्या कामाची सुरुवात आजपासून करा. मनोरंजनावर वेळ आणि पैसे खर्च कराल. नेहमीपेक्षा आजचा दिवस वेगळा असेल. घरातील सुधारणा करण्याच्या कामांचा विचार कराल. वेळेच नियोजन करा.
शुभरंग : राखाडी

सिंह (LEO – Tuesday, May 16, 2023)
शिवाचा अकरा वेळा नामजप करा. आरोग्य सुधारण्याकरिता प्रयत्न कराल. कामाच्या ठिकाणी तुमचा दिवस उत्तम जाईल. घरातील लहान मुलांना वेळ द्याल. खरेदीकरिता आज वेळ काढाल. जोडीदाराशी वाद होण्याची शक्यता आहे.
शुभरंग : पांढरा

कन्या (VIRGO – Tuesday, May 16, 2023)
गणपती मंदिरात जा. शारीरिक क्षमता वाढण्यासाठी व्यायाम करा. मेहनतीचे समाधानकारक फळ मिळेल. चिंता करत बसू नका. अडचणींवर मात कराल. व्यक्तिमत्त्वात बदल करण्यासाठी वेळ द्याल. घरात सुशोभिकरणाच्या वस्तू आणाल.
शुभरंग : सोनेरी

तूळ (LIBRA- Tuesday, May 16, 2023)
गाईला चारा खाऊ घाला. अत्यंत व्यस्त दिवस जाईल. गुंतवणुकीतून उत्तम नफा मिळेल. वरिष्ठ तुमच्या कामामुळे आनंदी होतील. धार्मिक कार्यात भाग घ्याल. विनाकारण वाद घालू नका. आपले मत स्पष्टपणे मांडा.
शुभरंग : नारिंगी

वृश्चिक ( SCORPIO – Tuesday, May 16, 2023)
दुधाची एक पिशवी गरीब महिलेला द्या. आशावादी राहा. आर्थिक व्यवहार करताना काळजी घ्या. घरी अनपेक्षित पाहुणे येण्याची शक्यता आहे. मनाजोगी खरेदी करण्यासाठी वेळ काढाल. लाल रंगाचा पोषाख परिधान करा.
शुभरंग : तांबडा

धनु (SAGITTARIUS – Tuesday, May 16, 2023)
उन्हात ठेवलेल्या लाल रंगाच्या बाटलीतील पाणी प्या. मौल्यवान वस्तूंची खरेदी कराल. आजचा दिवस लाभदायक आहे. नातेवाईकांना वेळ द्याल. सायंकाळी सिनेमा पाहायला जाण्यासाठी वेळ काढाल. घरातील मुलांकडे लक्ष द्याल. प्रिय व्यक्ती तुमच्यासाठी वेळ काढेल.
शुभरंग : गुलाबी

मकर (CAPRICORN – Tuesday, May 16, 2023)
चंदनाचा टिळा कपाळावर लावा. चांगल्या गोष्टीं घडतील. कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतील. नवीन कला आत्मसात करण्याचा प्रयत्न कराल. अनुभवी लोकांचे मार्गदर्शन घ्याल. ध्येय गाठण्याचा प्रयत्न कराल. अपेक्षित गोष्ट घडण्याची शक्यता आहे.
शुभरंग : हिरवा

कुंभ (AQUARIUS – Tuesday, May 16, 2023)
तांब्याच्या भांड्यातील पाणी प्या. नशिबावर हवाला ठेवून बसू नका. मेहनत आणि सहनशीलतेमुळे उद्दिष्ट गाठाल. आश्चर्याचा धक्का देणारी घटना घडण्याची शक्यता आहे. नातेवाईकांकडून अपेक्षा करू नका. आपले मत इतरांवर लादू नका. धनलाभाची शक्यता आहे.
शुभरंग : खाकी

मीन (PISCES – Tuesday, May 16, 2023)
अनपेक्षित भेटवस्तू मिळेल. वेळेचा सदुपयोग कराल. नोकरीत वरिष्ठांची मर्जी राखाल. धार्मिक कार्यात भाग घ्याल. आजचा दिवस प्रसन्नदायी असेल. नव्या कार्यक्षेत्राचा विचार कराल. देवाजवळ तिळाच्या तेलाचा दिवा लावा.
शुभरंग : पिवळा