Daily Horoscope – कसा असेल तुमच्यासाठी आजचा दिवस ? वाचा ’19 मे’चे राशीभविष्य

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मेष (ARIES – Friday, May 19, 2023)
कुटुंबियांना आलेल्या समस्यांवर तोडगा मिळेल. धन लाभाची शक्यता आहे. नातेवाईकांसोबत असलेले मतभेद दूर होतील. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. गरिबांना पाण्याचे दान करा. केशरी रंगाचा पोषाख परिधान करा. मनाजोगी खरेदी करण्यासाठी वेळ काढाल.
शुभरंग : हिरवा

वृषभ (TAURUS – Friday, May 19, 2023)
आर्थिक उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. कार्यक्षेत्रात घेतलेल्या मेहनतीला यश मिळेल. मित्रांच्या भरवशावर राहून कोणतीही कामे अर्धवट सोडू नका. पैसे उधार घेऊन कोणतेही काम करू नका. गुलाबी रंगाचा पोषाख परिधान करा. गरजूंना साखरेचे दान करा. शनी महात्म्य वाचा.
शुभरंग : निळा

मिथुन (GEMINI – Friday, May 19, 2023)
समाजात मान-सन्मान वाढेल. बोलताना समजून-उमजून बोला. मनातील नकारात्मकता, भीती दूर होईल. व्यवसाय-नोकरीत लाभ होईल. आहारात बदाम, काजू, बेदाणे या सुकामेव्याचा समावेश करा. शनी मंदिरात जाऊन तेल वाहा. घरात श्रीकृष्णाची आरती म्हणा.
शुभरंग : हिरवा

कर्क (CANCER – Friday, May 19, 2023)
धन लाभ होईल. नोकरीत प्रगती करण्याची संधी आहे. देवळात पिवळ्या रंगाच्या फळांचा प्रसाद वाटा. आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. गुलाबाची फुले फुलदाणीत ठेवा. मनातील चिंता दूर होईल. मारुती स्तोत्राचे वाचन करा. सामाजिक कार्यात भाग घेण्याची ईच्छा होईल. ब्यूटिपार्लरमध्ये जाण्यासाठी वेळ काढाल.
शुभरंग : आकाशी

सिंह (LEO – Friday, May 19, 2023)
खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. कामात व्यस्त राहाल. नशिबाची साथ मिळेल. मनातील इच्छा पूर्ण होतील. केशरी रंगाचा पोषाख परिधान करा. सकाळी देवपूजा झाल्यानंतर श्री विष्णूची आरती म्हणा. काचेच्या बाटलीतले पाणी प्या. तुळशीची मंजिरी पाण्यात घालून प्यायल्याने शरीरातील उष्णता वाढणार नाही.
शुभरंग : तांबडा

कन्या (VIRGO – Friday, May 19, 2023)
धन लाभाचे विविध मार्ग सापडत जातील. व्यापार-व्यवसायात प्रगती होईल. लोकं तुमच्या बोलण्याकडे आकर्षित होतील. सामाजिक संपर्कात वाढ होण्याची शक्यता आहे. घरातील फुलदाणीत मोरपिसे ठेवा. वांगी रंगाचा पोषाख परिधान कराल.
शुभरंग : केशरी

तूळ (LIBRA- Friday, May 19, 2023)
अडलेली कामे मार्गी लागतील. अचानक खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. करियरमध्ये प्रगती करण्याची संधी मिळेल. अचानक खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. शिव मंदिरात जल अभिषेक करा. वाणसामानाची खरेदी करण्यासाठी वेळ काढाल.
शुभरंग : पिवळा

वृश्चिक ( SCORPIO – Friday, May 19, 2023)
अचानक परिस्थितीत बदल होईल. प्रत्येक काम समजून उमजून करा. नातेवाईक अचानक घरी येण्याची शक्यता आहे. कपाळावर चंदनाचा टिळा लावा. देवळात तीळाच्या तेलाचे दान करा. दत्त मंदिरात जाऊन देवदर्शन घ्या. घरातील वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद घ्या. काचेच्या बाटलीतले पाणी प्या.
शुभरंग : राखाडी

धनु (SAGITTARIUS – Friday, May 19, 2023)
जोडीदाराचे सहकार्य लाभेल. कार्यक्षेत्रात आपल्याला मान मिळेल. दूरच्या प्रवासाचे योग आहेत. पिवळ्या रंगाचा पोषाख परिधान करा. ओम नमो भगवते वासुदेवाय हा नामजप 108 वेळा करा. घरासाठी लागणाऱ्या तांत्रिक वस्तूंची खरेदी कराल. तुळशीला पाणी घाला. गणपतीला जास्वंदाचे फूल वाहा.
शुभरंग : गुलाबी

मकर (CAPRICORN – Friday, May 19, 2023)
शत्रूंपासून सावध राहा. आपले काम वेळच्या वेळी पूर्ण करा. वेळच्या वेळी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. शासकीय कामे पूर्ण होतील. श्रीविष्णुसहस्त्रनामावलीचे वाचन करा. आवडती व्यक्ती तुमच्याकरिता वेळ काढेल. पांढऱ्या रंगाचा पोषाख खरेदी करा. लोकं तुमचा सल्ला विचारात घेतील. मन मारून जगू नका.
शुभरंग : हिरवा

कुंभ (AQUARIUS – Friday, May 19, 2023)
आपण आखलेल्या योजना सफल होतील. जागाविषयक गुंतवणुकीत लाभ होईल. कामातील अडथळे दूर होतील. घरात शुख शांती नांदेल. श्रीकृष्णाला लोणी-साखरेचा नैवेद्य दाखवा. आवडती कला जोपासाल. दागिन्यांची खरेदी कराविशी वाटेल. वाळ्याचे सरबत प्या. परसात पारिजातकाचे झाड लावून त्याची निगा राखा.
शुभरंग : जांभळा

मीन (PISCES – Friday, May 19, 2023)
आळस झटकून कामाला लागाल. कामातला उत्साह वाढेल. कोणाशीही बोलताना कटू वाणीचा वापर करू नका. खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. सकाळी उंबरठ्याची हळद लावून पूजा करा. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील.
शुभरंग : पांढरा