
शिर्डीहून रविवारी रात्री आलेल्या वंदे भारत ट्रेनचे ठाणे आणि दादर स्थानकांत दरवाजे न उघडल्याने प्रवाशांचा गोंधळ उडाला. गाडीचे दरवाजे आणि संगणक प्रणालीदरम्यान असलेल्या लिंकमध्ये कम्युनिकेशन गॅप होऊन सॉप्टवेअरमध्ये बिघाड झाल्याने गाडीचे दरवाजे उघडले नसल्याचे समोर आले आहे. वंदे भारत ही गाडी पूर्णपणे संगणक नियंत्रित असून दरवाज्यापासून सर्व काही स्वयंचलित आहे. शुक्रवारी ही गाडी शिर्डीहून आल्यानंतर ठाणे आणि दादर स्थानकात दरवाजे उघडले नव्हते. त्यामुळे प्रवाशांना गार्डच्या दरवाजाने उतरवले. रेल्वेच्या तंत्रज्ञाने सॉप्टवेअरमधील बिघाड दूर केल्याने सर्वकाही सुरळीत झाल्याचे रेल्वेने स्पष्ट केले आहे.





























































