
गेवराई तालुक्यातील गुळज येथील कालव्यामध्ये आंघोळीसाठी गेलेल्या दोन मुले वाहून गेली. त्यापैकी एकाचा मृतदेह रात्री नऊ वाजता सापडला तर दुसरा वाहून गेलेला मुलगा 24 तास होत आले असून त्याचा शोध अद्याप पर्यंत लागलेला नाही.
तालुक्यातील गुळज गावातील पठान चाँद कदीर यांच्या कडे काही कार्यक्रमानिमीत्त त्यांचे दोन भाचे अरबाज रईस शेख वय 14 व नासर हुसेन शेख वय 14 आले होते. हे दोघे कार्यक्रम संपल्यावर अंघोळीसाठी गावाजवळ असलेल्या उजव्या कालव्यावर गेले असता पाण्याचा अंदाज न आल्याने ते दोघेही बुडू लागले. दोन मुले वाहून गेल्याचे समजताच स्थानिक नागरिक व नगर परिषदेच्या अग्निशामक दलाच्या जवानांनी शोधकार्य सुरू केले. दरम्यान पाच किलोमीटीर अंतरावर असलेल्या पांचाळेश्वर शिवारात अरबाज रईस शेख याचा मृतदेह रात्री नऊ वाजताच्या सुमारास सापडला. तर एका मुलाचा शोध अद्याप सुरू आहे.
























































