प्ले स्टोअर मधून Paytm ऍप गायब, Google दिले हे कारण

Google ने शुक्रवारी गूगल प्ले स्टोअर मधून Paytm ऍप हटवले आहे. यामुळे लाखो Paytm युजर्सला मोठा धक्का बसला आहे. गूगलने हे ऍप का हटवले यामागील कारणही स्पष्ट केले आहे. कोणत्याही गँबलिंग ऍप (जुगार) चे आम्ही समर्थन करू शकत नाही, असे गूगलने म्हटले आहे.

देशात अनेक छोटे-मोठे व्यापारी पैशांची देवाण-घेवाण करण्यासाठी Paytm ऍपचा वापर करतात. ऑनलाईन व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी Paytm ऍपचा वापर वाढला होता. मात्र गूगलने शुक्रवारी अचानक हे ऍप प्ले स्टोअर मधून हटवले.यामुळे खळबळ उडाली.

दरम्यान, Paytm ने नियमांचे उल्लंघन केल्याने गूगलने ही कारवाई केली आहे. याबाबत गूगलचे उपाध्यक्ष सुझेन फ्रेय ( Suzanne Frey) यांनी सांगितले की, आम्ही ऑनलाईन जुगाराला (कॅसिनो) परवानगी देऊ शकत नाही. तसेच सट्टेबाजीचे समर्थन करणाऱ्या कोणत्याही ऍपला आम्ही पाठिंबा देऊ शकत नाही, असे त्यांनी सांगितले. याचमुळे Paytm वर कारवाई करण्यात आली.

आपली प्रतिक्रिया द्या