नीरव मोदीच्या बंगल्याला लागणार सुरुंग, डिटोटनेरने बांधकाम जमीनदोस्त करणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । अलिबाग

उत्तम दर्जाच्या सिमेंट काँक्रीटने बांधलेला आणि किमती वस्तूने सजवलेला अलिबाग येथील नीरव मोदीच्या आलिशान बंगल्याला अखेर सुरुंग लागणार आहे. अतिशय पक्के बांधकाम असलेला हा बंगला जेसीबी, पोकलेनने पाडणे शक्य नसल्याने डिटोनेटर लावून तो जमीनदोस्त करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. न्यायालयाची परवानगी मिळताच सुरुंग लावून एका झटक्यात पत्त्यासारखा आलिशान बंगला भुईसपाट करण्यात येणार आहे.

डायमंडपिंग नीरव मोदी याच्या अलिबाग येथील अनधिपृत बंगल्यावर जिल्हा प्रशासनाकडून कारवाई करण्यास 25 जानेवारी रोजी सुरुवात झाली. बंगल्याच्या मागच्या बाजूने जेसीबी लावून ही कारवाई सुरू करण्यात आली. मात्र मजबूत बांधकामामुळे आतापर्यंत केवळ बंगल्याचे दोन टक्केच बांधकाम पाडण्यात यश आले. खूप प्रयत्न करूनही पोकलेनने बांधकाम तुटत नसल्याने अखेर लोणारे येथील बाबासाहेब आंबेडकर अभियांत्रिकी विद्यालयाच्या अभियंता पथकाला पाचारण करण्यात आले. त्यांनी दिलेल्या स्ट्रक्चरल ऑडिटनुसार जेसीबी वा पोकलन यासारख्या मशीनने हे बांधकाम पाडणे शक्य नसल्याने हा बंगला नियंत्रित स्पह्टाने (डिटोनेर) पाडण्याचा अभिप्राय अभियंता पथकाने जिल्हा प्रशासनाला दिला आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासन डिटोनेटरने बंगला पाडण्याची परवानगी न्यायालयाकडे मागणार आहे. बंगल्यात असलेल्या मौल्यवान वस्तू आधीच ईडीने नेल्या असून काही वस्तू अद्यापही बंगल्यात आहेत. या वस्तू बाहेर काढून बंगला पूर्ण रिकामा करण्यात येणार आहे. न्यायालयाची परवानगी मिळताच बंगला डिटोनेटर लावून पाण्यात येणार असून तोपर्यंत बांधकाम तोडण्याची कारवाई थांबवण्यात आली आहे.

ये दिवार तुटती क्यो नही…
दोन जेसीबी, पोकलेनच्या सहाय्याने नीरवा मोदीचा बंगला पाण्यासाठी मोठय़ा जोशमध्ये जिल्हा प्रशासनाचे पथक अलिबागमध्ये धडकले. मात्र खूप जोर लावूनही ‘ये दिवार तुटती क्यो नही’ असा प्रश्न जिल्हा प्रशासनाला पडला. लोणारे येथील बाबासाहेब आंबेडकर अभियांत्रिकी विद्यालयाच्या अभियंता पथकाने केलेल्या स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये हा बंगला मजबूत अशा दगडाने व आरसीसी बांधकाम करून बांधण्यात आल्याचे त्याच्या निदर्शनास आले.