ऐन गर्दीच्या वेळी हार्बरने नांगी टाकली; डॉकयार्ड रोडमध्ये रुळाला तडे, तुर्भेत सिग्नल बिघाड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

हार्बर मार्गावरील डॉकयार्ड रोड रेल्वे स्थानकात सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास रेल्वे रुळाला तडा गेल्याने शुक्रवारी सायंकाळी मध्य रेल्वेची वाहतूक अर्धा तास विस्कळीत झाली. त्यातच ट्रान्सहार्बर मार्गावरील तुर्भे स्थानकात सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने कामावरून घरी परतणाऱ्या हार्बर-ट्रान्सहार्बरच्या प्रवाशांना गर्दीचा सामना करावा लागला. कुर्ला ते सीएसएमटीदरम्यान लोकलच्या रांगा लागल्या. सायं. 6.30 ते 6.50 वाजेपर्यंत ट्रकचे दुरुस्ती काम लागलीच आटोपल्याने हार्बरच्या गाडय़ा हळूहळू पूर्वपदावर आल्या. ठाणे ते वाशी/पनवेल ट्रान्सहार्बर मार्गावरील तुर्भे रेल्वे स्थानकात याच सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने हार्बर-ट्रान्सहार्बर दोन्ही सेवांना फटका बसल्याने प्रवाशांचे हाल झाले.