हाशिम आमला क्रिकेटमधून निवृत्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

2019 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या हाशिम आमलाने आता सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे आता आमला सरे संघाकडून काऊंटी अजिंक्यपद स्पर्धेतही खेळणार नसल्याचे कळविले आहे.

दोन दशकांच्या क्रिकेट कारकीर्दीत 39 वर्षीय आमलाने सर्व व्यावसायिक क्रिकेट प्रकारात 34,104 धावा केल्या आहेत. त्याने दक्षिण आफ्रिकेचे प्रतिनिधित्व करताना 124 कसोटींत 9282 धावा केल्या असून त्यात 28 शतकेही ठोकली आहेत. 2012 साली ओव्हलवर खेळताना 311 धावा केल्या होत्या आणि हे दक्षिण आफ्रिकेसाठी केले गेलेले पहिले त्रिशतक होते. त्याने वन डेतही 29 शतकांसह 8113 धावा केल्या आहेत तर टी-20 मध्ये 1217 धावा केल्या आहेत. सध्या त्याने प्रशिक्षणावर आपले लक्ष्य केंद्रित केले असून तो भविष्यात दक्षिण आफ्रिकेचा फलंदाजीचा प्रशिक्षकही बनू शकतो.