अॅरोन फिंचचा पुन्हा शतकी झंझावात, पाकिस्तान पिछाडीवर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
aaron-finch-aus

सामना ऑनलाईन । शारजाह

इंग्लंडमध्ये होणाऱ्या वर्ल्ड कपआधी पाच वेळा वर्ल्ड चॅम्पियन ठरलेला ऑस्ट्रेलियन संघ फॉर्ममध्ये आलाय. हिंदुस्थानला हिंदुस्थानात पराभूत केल्यानंतर आता कांगारूंनी पाकिस्तानला पहिल्या दोन्ही वन डेंत पराभूत केले आहे. कर्णधार अॅरोन फिंचने सलग दुसऱया वन डेत झंझावाती शतक झळकावताना संघाला पाकिस्तानवर आठ गडी व 13 चेंडू राखून विजय मिळवून दिला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने पाच सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली. अॅरोन फिंचचीच सामनावीर म्हणून निवड करण्यात आली.

285 धावांचा पाठलाग करणाऱया ऑस्ट्रेलियन सलामीवीरांनी 209 धावांची भागीदारी केली. उस्मान ख्वाजाने 88 धावांची आणि अॅरोन फिंचने नाबाद 153 धावांची खेळी साकारली. अॅरोन फिंचने 143 चेंडूंत सहा सणसणीत षटकारांसह 11 चौकारांची बरसात केली. ट्वेण्टी-20 व वन डेत दीड शतकी खेळी करणारा ऍरोन फिंच पहिला फलंदाज ठरलाय हे विशेष.