सावरकरांच्या पणतूची राहुलविरोधात तक्रार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
rahul-gandhi

सामना प्रतिनिधी । मुंबई

छत्तीसगढ येथील एका प्रचार रॅलीत स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विरोधात अपमानास्पद वक्तव्य केल्याप्रकरणी सावरकरांच्या पणतूने काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या विरोधात शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला आहे.

विनायक दामोदर सावरकर यांनी तुरुंगातून सुटका व्हावी यासाठी ब्रिटिश सरकारकडे माफी मागितली होती, असे वक्तव्य राहुल गांधी यांनी नुकत्याच झालेल्या छत्तीसगढमधील एका प्रचार रॅलीत केले होते. यामुळे सावरकर यांचे पणतू रणजित सावरकर यांच्या भावना दुखावल्या असून त्यांनी राहुल गांधी यांनी केलेल्या अपमानास्पद वक्तव्याच्या विरोधात मुंबईच्या शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला आहे. रणजित सावरकर यांनी आमच्याकडे तक्रार केली असून ती आम्ही पुढील कारवाईकरिता छत्तीसगढमधील संबंधित पोलीस ठाण्याकडे पाठविणार असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱयाने सांगितले.