हिंगोलीत २३ दिवस डांबून अल्पवयीन मुलीवर बलात्कार

प्रातिनिधिक फोटो

हिंगोली जिल्ह्यातील एका शेतात तब्बल २३ दिवस डांबून एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आल्याची घटना शुक्रवारी रात्री उघडकीस आली आहे. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून एक संशयीत फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी चंदनझिरा पोलिसांनी शुक्रवारी रात्री उशिरा हिंगोली जिल्ह्यातून एकास तर चंदनझिरा परिसरातून दोन महिलेसह अशा तिघांना ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जालना शहरातील चंदनझिरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुंदरनगर येथील अल्पवयीन मुलगी १३ नोव्हेंबर रोजी बेपत्ता झाली होती. या प्रकरणी चंदनझिरा पोलीस ठाण्यात मुलीच्या आईने तक्रार दाखल केली होती. या प्रकरणाचा तपास करत असतांना पोलिसांसमोर दोन ते तीन संशयितांची नावे पुढे आली. पोलीसांनी या संशयितांवर पाळत ठेवून होते. शुक्रवारी रात्री पोलिसांनी या संशयितांना पाठलाग केला असता त्यांना या तेरा वर्षीय अल्पवयीय मुलीला हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव येथील एका शेतात डांबल्याचे आढळले. पोलिसांनी या मुलीची सुटका केली असून तिच्यावर बलात्कार झाल्याचे तपासात पुढे आले आहे. याप्रकरणी तीन संशयितांना चंदनझिरा पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. यात दत्ता यादव धनगर आणि दोन महिलांचा समावेश आहे. तर याप्रकरणातील अन्य फरारीचा शोध पोलीस घेत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या