हजारो लिटर दुध नासू नये म्हणून दुधाचा टँकर कसा साफ करतात? वाचा सविस्तर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दुध हे नाशवंत पदार्थ आहे. त्यात थोडा जरी हलगर्जी पणा दाखवला तर संपूर्ण दूध नासतं. अशावेळी मोठ मोठ्या दुध डेर्‍या आणि कंपन्या काय काळजी घेतात. दूधाचा टँकर साफ कसा करतात? याचे उत्तर सामनाच्या वाचकांसाठी आम्ही शोधले आहे.

कोरा या वेबसाईटवर शकील जामदार या युजरने याचे उत्तर दिले आहे. शकील जामदार हे दुध केंद्रात नोकरीवर आहेत म्हणून त्यांनी या प्रश्नाचे सविस्तर उत्तर दिले आहे.

दुध संकलन केंद्रात दररोज दूधाचे टँकर तपासले जातात. जर दूधाचा टँकर स्वच्छ नसेल तर संपुर्ण दुध खराब होण्याची शक्यता असते शकते. दूधाचा टँकर व्यवस्थित स्वच्छ न धुतल्यास दूधाचे तापमान आणि आम्लता वाढते आणि दुध नाकारले जाऊ शकते. यामुळे दुध उत्पादकांचे आणि कंपनीचे मोठे नुकसान होते. सहा चाकी टँकरची 10 ते 12 हजार लिटरची दूध साठवण्याची क्षमता असते. तसेच दहा चाकी टँकरमध्ये 20 ते 22 हजार लिटरची क्षमता असते.

दूधाच्या टँकरमध्ये दुध सोडत असताना दुध थंड करुन सोडावे लागते. तेव्हा दूधाचे तापमान 3 ते 4 अंश सेल्सियस असते. जास्त अंशामध्ये दुध सोडल्याने दूधाची आम्लता वाढुन दूधाला वास येऊ शकतो. दुध हे नाशवंत असल्याने खुप मोठे नुकसान होऊ शकते म्हणुन दररोज टँकर तपासल्याशिवाय दुध सोडले जात नाही.

दूधाच्या टँकरमधुन दुध रिकामे झाल्यानंतर दूधाच्या टाकीमध्ये गरम पाण्याचा फवारा मारला जातो. गरम पाण्यामुळे टाकीला चिकटलेली मलई स्वच्छ होते, त्यानंतर टाकीमध्ये गरम पाण्याची वाफ सोडली जाते. नंतर लिक्वीडने टाकीमध्ये आत उतरुन सर्व टाकी धुतली जाते. त्यानंतर पाणी मारुन स्वच्छ केले जाते. शेवटी दुध जाणारे व्हाल्व्ह असतात, त्यामध्ये मोठा ब्रश घालुन पाईप लाईन स्वच्छ केली जाते. दुध रिकामे करुन डेअरीमधुन बाहेर पडताना गेटवर कर्मचारी किंवा वॉचमनकडून टँकर स्वच्छ धुतलेला आहे की नाही याची खात्री केली जाते. हे खात्री झाल्यानंतरच टँकर गेटमधुन बाहेर सोडला जातो.

दूधाच्या व्यवसायात स्वच्छता खुप महत्वाची आहे आणि त्याचे कडक पालन दुध उत्पादन कंपनी आणि डेअरी व्यावसियाकांकडून केले जाते. दुध हे नाशवंत आणि खाण्याची वस्तू आहेल त्यामुळे कमालीची स्वच्छता राखावीच लागते. दुध डेअरीमध्ये दुध संकलन दरम्यान डोक्यातील केस वगैरे दूधात पडू नयेत म्हणुन कर्मचार्‍यांना टोप्या घातलेल्या असतात. तसेच पान, तंबाखु, सिगारेट या गोष्टींना सक्त मनाई आहे. तसे दिसल्यास दंड आकारण्यात येतो आणि पुन्हा त्या व्यक्तीला डेअरीमध्ये प्रवेश करण्यास परवानगी दिली जात नाही.