निवडलेल्या प्रकल्पाचा अभ्यास कसा करावा?

जेव्हा एखाद्या प्रदीर्घ प्रोजेक्टवर काम केले जाते तेव्हा त्याचे नियोजन कसे करावे हे सांगणारे पुस्तक.

अगदी मोठी प्रचंड लोकसंख्या असलेला हिंदुस्थानसारखा देश असो की छोटंसं राज्य, प्रत्येकाची प्रगती ही त्यांनी हाती घेतलेल्या विविध प्रकल्पांमुळे. मात्र असे प्रकल्प नुसते आखून चालत नाहीत, ते विशिष्ट काळात, ठराविक आर्थिक मर्यादेत पूर्णत्वाला नेणं हेदेखील खूप महत्त्वाचं असतं. यासाठी लागतं ते काटेकोर व्यवस्थापन. काळाची ही पावलं ओळखून मुंबई विद्यापीठानं गेल्याच वर्षी त्यांच्या MMS या व्यवस्थापनाशी निगडित अभ्यासक्रमात प्रकल्प व्यवस्थापन – प्रोजेक्ट मॅनेजमेंट – या विषयाचा अंतर्भाव केला.

या विषयाशी संबंधित पुस्तकं अनेक आहेत, परंतु विद्यार्थ्यांना परीक्षा, त्यात शिकवला जाणारा संपूर्ण अभ्यासक्रम लक्षात घेऊन त्याप्रमाणे आवश्यक प्रकरणांची मांडणी करणारं  ‘प्रोजेक्ट मॅनेजमेंट’ हे नवीन पुस्तक बाजारात आलं आहे.  प्राध्यापक विलास कबरे यांनी विद्यार्थ्यांशी इतकी वर्षे संवाद साधताना घडलेली साधना त्यांनी इथं पणाला लागल्यासारखं वाटावं इतकी सहज या पुस्तकाची मांडणी आहे. त्यात त्यांनी प्रकल्पाची वैशिष्टय़े, प्रकार याबद्दल लिहिलं आहे. तसेच प्रकल्पाची गुणवत्ता, वाव, वेळ, अडथळे, जबाबदारी याबद्दलही विस्तृतपणे विवेचन केलेलं आहे. पुस्तकाला डॉ. संगीता टंडन तसेच परदेशस्थ प्रा गणेश कुडाव यांची प्रस्तावना लाभली आहे. त्यांनी लिहिलेले हे पुस्तक एमएमएस/ एमबीएचे विद्यार्थी तसेच प्रकल्प व्यवस्थापनात असणाऱ्या व जाऊ इच्छिणाऱ्यांना तर उपयोगी आहेच.

  • प्रोजेक्ट मॅनेजमेंट n प्रा. विलास कबरे
  •  हिमालया पब्लिशिंग हाऊस n 360/-
आपली प्रतिक्रिया द्या