ICC Ranking रोहित-विराटचे स्थान ‘जैसे थे’, भेदक गोलंदाजीचा बुमराहला झाला फायदा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ओव्हल कसोटी संपल्यानंतर आयसीसीने जागतिक कसोटी क्रमवारी जाहीर केली आहे. ताज्या क्रमवारीमध्ये ओव्हल कसोटीत शतकी खेळी करणारा रोहित शर्मा आणि पहिल्या डावात अर्धशतक ठोकणारा कर्णधार विराट कोहली आपापल्या स्थानांवर कायम आहेत. गोलंदाजीमध्ये मात्र भेदक मारा करणारा जसप्रीत बुमराह याला फायदा झाला आहे.

बुधवारी जाहीर करण्यात आलेल्या क्रमवारीमध्ये पहिल्या 10 फलंदाजांनी आपले स्थान कायम राखले आहे. रोहित शर्मा 813 गुणांसह पाचव्या, कर्णधार विराट कोहली 783 गुणांसह सहाव्या स्थानावर आहे. इंग्लंडचा कर्णदार ज्यो रूट 903 गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. मात्र ओव्हल कसोटीतील खराब कामगिरीचा त्याला फटका बसला असून 13 गुणांचे नुकसान त्याला सोसावे लागले. न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन 901 गुणांसह दुसऱ्या तर ऑस्ट्रेलियाचा स्टिव्ह स्मिथ 891 गुणांसह पाचव्या स्थानावर विराजमान आहे.

T20WC गावस्कर यांनी निवडला हिंदुस्थानचा संघ, सलामीला नवीन जोडी; ‘या’ दोघांना वगळलं

गोलंदाजीमध्ये हिंदुस्थानचा फिरकीपटू आर. अश्विन दुसऱ्या स्थानावर कायम आहे. इंग्लंडविरुद्ध पहिल्या चारही कसोटीत त्याला संधी मिळालेली नाही. तर इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेत दमदार कामगिरी करणारा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याला एका स्थानाचा फायदा झाला असून तो आता नवव्या स्थानावर पोहोचला आहे. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स पहिल्या, न्यूझीलंडचा गोलंदाज टीम साऊदी तिसऱ्या स्थानावर आहे. ओव्हल कसोटीत खराब कामगिरी करणारा इंग्लंडचा गोलरंदाज जेम्स अँडरसन याला दोन स्थानांचे नुकसान झाले असून त्याची सातव्या स्थानावर घसरण झाली आहे.

अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत टीम इंडियाचा रविंद्र जाडेजा 338 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. मात्र आर. अश्विन याचे एका स्थानाने नुकसान झाले असून तो 331 गुणांसह पाचव्या स्थानावर घसरला आहे. तर ओव्हल कसोटीमध्ये इंग्लंडकडून चांगली कामगिरी करणाऱ्या ख्रिस ओक्स याने टॉप 10 मध्ये प्रवेश केला आहे.

INDvENG रोहितचं शतक म्हणजे टीम इंडियाच्या विजयाची गॅरंटी, जाणून घ्या खास आकडेवारी