
सामना प्रतिनिधी । मुंबई
चोरीच्या गुन्हय़ात अटक करण्यात आलेल्या अनिकेत खिक्ची या भुरट्या चोराच्या कोठडीतील मृत्यूप्रकरणी सात वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आलेल्या तीन पोलिसांना मुंबई उच्च न्यायालयाने आज जामीन मंजूर केला.
खिक्ची याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाने हेड कॉन्स्टेबल चंद्रकांत कांबळे यांच्यासह उमेश गोसावी, संदीप साळुंखे आणि किरण पिंगळे या पोलीस कर्मचाऱ्यांना ७ वर्षांची शिक्षा ठोठावली होती. या शिक्षेविरुद्ध हेडकॉन्स्टेबल कांबळे वगळत्या तिघा पोलिसांनी मुंबई उच्च न्यायालय अपील अर्ज दाखल केला आहे. या अर्जाची सुनावणी आज दुपारी न्यायमूर्ती बी.आर. गवई आणि न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्यासमोर झाली.


























































