IND Vs WI – शांतता, संयम आणि परफेक्ट कार्यक्रम! 22 महिन्यांची बंदी, खडतर प्रवास अन् कॅम्पेबलने 65 चेंडूत धडाकेबाज शतक ठोकलं

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थान आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील दुसरा सामना गुवाहाटी येथे सुरू झाला आहे. प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजने आक्रमक फलंदाजीच प्रदर्शन करत 300 हून अधिक धावा चोपून काढल्या आहेत. यामध्ये लक्षवेधी कामगिरी केली ती जॉन कॅम्पबेलने. त्याने चौफेर फटकेबाजी करत 65 चेंडूंमध्ये शतक ठोकत क्रिकेट विश्वाचं लक्ष वेधून घेतलं. विशेष म्हणजे, टीम इंडियाविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये वेस्ट इंडीजकडून झळकावलेले हे सर्वात जलद शतक ठरले असून, त्याने तब्बल 26 वर्षांपूर्वीचा रिकार्डो पावेलचा विक्रम मोडीत काढला आहे.

जॉन कॅम्पेबलची कामगिरी त्याच्या वैयक्तीक आयुष्यात घडलेल्या एका घटनेमुळे चर्चेत आली आहे. त्याचा इथपर्यंतचा प्रवास म्हणावा तितका सोपा नव्हता. देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याने आपल्या फलंदाजीची जादू दाखवत निवडकर्त्यांच लक्ष वेधून घेतलं. त्यानंतर 2019 मध्ये वेस्ट इंडिजकडून खेळण्याची त्याला संधी मिळाली. काही वर्ष खेळल्यानंतर 2022 हे वर्ष त्याच्या क्रिकेट कारकिर्दीला हादरा देणार ठरलं. जमैका उत्तेजकविरोधी आयोगाच्या (JADCO) एका प्रकरणामुळे त्याच्या कारकिर्दीला मोठा धक्का बसला आणि त्याला सुरुवातीला चार वर्षांची बंदी घालण्यात आली होती. मात्र, कॅम्पेबल शांत बसला नाही.

या बंदीविरोधात कॅम्पबेलने लढा दिला आणि क्रीडा लवाद न्यायालयात (CAS) अपील केले. न्यायालयाधारे त्याची ही शिक्षा कमी करून 22 महिन्यांवर आणण्यात आली, ज्यामुळे त्याला पुन्हा क्रिकेटच्या मैदानात पुनरागमन करणे शक्य झाले. मधल्या काळात आलेल्या या मोठ्या अडथळ्यावर मात करत कॅम्पबेलने पुन्हा एकदा आपल्या आक्रमक खेळाची झलक दाखवली असून, गतवर्षी टीम इंडियाविरुद्धच कसोटी शतक झळकावणाऱ्या कॅम्पबेलने आता एकदिवसीय क्रिकेटमध्येही आपले महत्त्व सिद्ध केले आहे. विशेष म्हणजे जेव्हा कॅम्पेबलने आंतरराष्ट्रीय पदार्पण करून आपल्या विस्फोटक फलंदाजीचा जलवा दाखवला होता, तेव्हा खुद्ध ख्रिस गेलने त्याच कौतुक करत “तो पुढे क्रिस गेल बनेल” अशी मोठी पावती दिली होती.