सीमेवर दहशतवादी हल्ल्यांत तीन वर्षांत 31 जवान शहीद

255

देशाच्या सीमेवर गेल्या तीन वर्षांत दहशतवादी हल्ल्यांत लष्कराचे 31 जवान शहीद झाले. केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी सोमवारी राज्यसभेत उपस्थित झालेल्या प्रश्नावर लेखी स्वरूपात ही माहिती दिली. 2016 साली 6 जवान, 2017 साली 13, तर 2018 साली 12 जवान शहीद झाल्याचे राज्यमंत्री नाईक यांनी स्पष्ट केले. दहशतवादी हल्ल्यांना जशास जसे उत्तर देण्यासाठी सर्व यंत्रणा पूर्णपणे बळकट केल्या आहेत. त्याचबरोबर संरक्षण दलात आधुनिक तंत्रांचा वापर करणे यांसारख्या सुधारणा सातत्याने केल्या जात आहेत. दहशतवादी हल्ल्यांबरोबरच सुरक्षा भेदण्याच्या इतर प्रकारांचा लष्कराकडून सखोल आढावा घेतला जात आहे, असे राज्यमंत्र्यांनी लेखी उत्तरात म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या