
येत्या 1 ते 6 डिसेंबर दरम्यान रशियामध्ये इंडियन फिल्म फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. रशियातील 24 शहरांमध्ये महोत्सव रंगणार असून ‘पुष्पा- द राईज’ या चित्रपटाने त्याचा शुभारंभ होणार आहे. याशिवाय ‘माय नेम इज खान’, डिस्को डान्सर’, ‘आरआरआर – राइज रोअर रिवोल्ट’, ‘दंगल’, ‘वॉर’ या चित्रपटांचादेखील समावेश आहे. इंडियन फिल्म्स कंपनीने इंडियन नॅशनल कल्चरल सेंटर आणि रशियन फेडरेशनच्या सांस्कृतिक मंत्रालय आणि हिंदुस्थानी दूतावासाच्या सहकार्याने या चित्रपट महोत्सवाचे आयोजन केले आहे.