महाजन यांचा गौप्यस्फोट, भाजपविरोधातील मुद्दे काँग्रेसला द्यायचे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
bjp

देशात भीतीचे वातावरण असून केंद्र सरकारवर टीका करायलाही लोक घाबरतात, असे खळबळजनक वक्तव्य करत प्रसिद्ध उद्योगपती राहुल बजाज यांनी मोदी सरकारवर नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर माजी लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी मध्य प्रदेशमध्ये भाजपच्या शासनकाळात अनेक महत्वपूर्ण मुद्दे उपस्थित करण्यासाठी आपण काँग्रेस नेत्यांना संपर्क करायचो, असे सांगत भाजपमधील मुस्कटदाबीला वाचा फोडली आहे.

आपण भाजपमध्ये असल्याने पक्षाविरोधात बोलू शकत नव्हतो. म्हणून काही मुद्द्यांवर बोलण्यासाठी काँग्रेस नेत्यांची मदत घ्यायचे, असे महाजन म्हणाल्या आहेत.

रविवारी शिक्षण मंत्री जितू पटवारी यांनी रविवारी आपल्या घरात एका संवाद कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी मध्य प्रदेशचे राज्यपाल लालजी टंडन आणि जितू पटवारीही उपस्थित होते. यात गप्पाच्या ओघात बोलताना महाजन यांनी आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या. तसेच यावेळी त्यांनी इंदूरचा विकास व्हावा हीच आमची इच्छा आहे. यामुळे  याच आम्ही राजकारण करत नाही. आपल्या शहराचे आपल्यालाच भले करायचे आहे. यासाठीच मी काँग्रेस नेत्यांना इंदूर मुद्द्यावर बोलायला सांगायचे. असेही महाजन यांनी म्हटले आहे. इंडिया टुडेने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केले आहे.

sumitra-mahajan

 

लोकसभा निवडणुकीवेळी देखील सुमित्रा महाजन यांची नाराजी समोर आली होती.

निवडणूक न लढवण्याचा मीच निर्णय घेतेय; सुमित्रा महाजन यांचे पक्षनेतृत्वाला पत्र