IPL 2020 – ‘ऑरेंज’ कॅपवर राहुल, तर ‘पर्पल’ कॅपवर रबाडाचा कब्जा

इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेचा 13 वा हंगाम यूएईमध्ये पार पडला. कोरोना संकटकाळात प्रेक्षकांविना घेण्यात आलेल्या स्पर्धेवर मुंबई इंडियन्सने विजयी मोहोर उमटवली. मुंबईने दिल्ली कॅपिटल्सचा पराभव करत पाचव्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकली.

आयपीएल 2020 स्पर्धेत मुंबईने बाजी मारली असली तरी सर्वाधिक धावा करण्याचा आणि सर्वाधित बळी घेण्याचा विक्रम अनुक्रमे के.एल. राहुल आणि कागिसो रबाडा यांनी केला. किंग्ज इलेव्हन पंजाबच्या राहुलने ऑरेंज कॅपवर कब्जा केला तर रबाडाने पर्पल कॅप जिंकली.

IPL 2020मध्ये सर्वाधिक धावा करणारे टॉप 10 फलंदाज, अनकॅप खेळाडूंनी उमटवला ठसा

राहुलची कामगिरी

किंग्ज इलेव्हन पंजाबचे आव्हान साखळी फेरीत संपुष्टात आले. मात्र सर्वाधिक धावा पंजाबचा कर्णधार के.एल. राहुलने केल्या. त्याने 154 लढतीत 670 धावा केल्या. यात त्याने 1 शतक आणि 5 अर्धशतक ठोकले. नाबाद 132 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या राहिली.

Photo – ना गेल, ना विराट; ‘हा’ खेळाडू ठरला IPL 2020चा ‘सिक्सर किंग’

रबाडाची कामगिरी

दिल्ली कॅपिटल्स संघाचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा आणि मुंबई इंडियन्सचा गोलंदाज जसप्रीत बुमराह या दोघात पर्पल कॅपसाठी रस्सीखेच सुरू होती. मात्र अखेरच्या दोन लढतीत 5 बळी घेत रबडाने बाजी मारली. त्याने स्पर्धेत 17 लढतीत 30 बळी घेतले. 24 धावांवर 4 बळी ही त्याची सर्वोच्च कामगिरी राहिली.

Photo – IPL 2020 मध्ये सर्वाधिक बळी घेणारे टॉप 5 गोलंदाज

आपली प्रतिक्रिया द्या