IPL 2020 – बंगळुरूच्या पराभवाची हॅट्ट्रिक, हैद्राबाद प्ले ऑफच्या रेसमध्ये कायम

शनिवारी झालेल्या दुसऱ्या लढतीत सनरायझर्स हैद्राबाद संघाने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा 5 विकेट्सने पराभव केला. विराट कोहलीच्या बंगळुरूचा सलग तिसरा पराभव आहे, तर हैद्राबादने सलग दुसरा विजय मिळवत गुणतालिकेत चौथ्या स्थानी झेप घेतली आहे. यामुळे प्ले ऑफची चुरस आणखी वाढली आहे.

बंगळुरूने विजयासाठी दिलेले 121 धावांचे आव्हान हैद्राबादने 5 गड्यांच्या मोबदल्यात 14.1 षटकात पार केले. हैद्राबादकडून ऋद्धिमान साहा याने 39, मनीष पांडे आणि होल्डरने प्रत्येकी 26 धावांची खेळी केली.

बंगळुरूकडून युझवेंद्र चहल याने सर्वाधिक 2 बळी घेतले, तर वाशिंग्टन सुंदर, नवदीप सैनी आणि उडाना यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला.

खराब फलंदाजी

बंगळुरूने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 7 बाद 120 धावा केल्या. फिलिपने सर्वाधिक 32, डिव्हीलिअर्सने 24 आणि सुंदरने 21 धावा केल्या. इतर फलंदाजांनी हाराकिरी केल्याने बंगळुरूला मोठी धावसंख्या उभारता आली नाही.

हैद्राबाद कडून संदीप शर्मा आणि जेसन होल्डर याने प्रत्येकी 1 बळी घेतले. तर नटराजन, नदीम कानी राशीद खान यांनी प्रत्येकी 1 बळी घेतले.

आपली प्रतिक्रिया द्या